Bhiwandi : हॉर्न वाजवल्याच्या रागातून राडा; दुचाकीस्वारावर जीवघेणा हल्ला; दोघांना अटक
Bhiwandi : हॉर्न वाजवल्याच्या रागातून राडा; दुचाकीस्वारावर जीवघेणा हल्ला; दोघांना अटकनारपोली पोलीस ठाणे (संग्रहित छायाचित्र)

Bhiwandi : हॉर्न वाजवल्याच्या रागातून राडा; दुचाकीस्वारावर जीवघेणा हल्ला; दोघांना अटक

कामतघर येथील ब्रह्मानंद नगर येथील दयाराम चौधरी बावडीजवळ आरोपींची मारूती सुझुकी कंपनीची कार ही उभी होती. त्यावेळी सदर गाडीच्या पुढे जाण्यासाठी दुचाकीस्वार निखिलने हॉर्न वाजवला.
Published on

भिवंडी : दुचाकीस्वाराने पुढे उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाला हॉर्न वाजवल्याने वाहनातील तिघांनी आपसात संगनमताने दुचाकीस्वाराजवळ येवून त्यास शिवीगाळ केली. दुचाकीस्वाराने तिघांना शिवीगाळ केल्याचा जाब विचारताच तिघांपैकी दोघांनी दुचाकीस्वाराची कॉलर पकडून तिसऱ्या आरोपीने गाडीतील लोखंडी रॉड आणून एकाने रॉडने दुचाकीस्वारावर जीवघेणा हल्ला केला, तर याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

अभिषेक उर्फ अभ्या संभाजी देशमुख (२६), शिवम गुड्डू शर्मा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, तर निखिल तुकाराम खरात असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ डिसेंबर रोजी कामतघर येथील ब्रह्मानंद नगर येथील दयाराम चौधरी बावडीजवळ आरोपींची मारूती सुझुकी कंपनीची कार ही उभी होती. त्यावेळी सदर गाडीच्या पुढे जाण्यासाठी दुचाकीस्वार निखिलने हॉर्न वाजवला. याचाच राग मनात धरून तिघांनी निखिलला शिवीगाळ केली.

त्यानंतर निखिलने आरोपींना शिवीगाळ का करता, असा जाब विचारताच आरोपींपैकी अभिषेक व दुबे यांनी निखिलच्या शर्टची कॉलर पकडून ठोश्या बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शुभमने गाडीतून लोखंडी रॉड आणून अभिषेककडे दिल्यानंतर त्याने सदर रॉड निखिलच्या डोक्यात मारून जीवघेणा हल्ला केला असता निखिलने हा हल्ला चुकवूनही तो जखमी झाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in