
आज दुपारी १२च्या दरम्याने भिवंडीमध्ये एक इमारत कोसळल्याची घटना घडली. या अपघातामध्ये १०हुन अधिक जण मातीच्या ढिगाऱ्याखालील दाबले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
भिवंडीत वलपाडा परिसरात ३ मजली इमारत कोसळली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांचे पथक आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. सध्या बचावकार्य सुरु असून अद्याप मोठ्या जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही.