Bhiwandi : लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या पतीचा प्रेयसीच्या साथीने बायकोवर हल्ला; हल्लेखोर नवऱ्यासह प्रेयसीवर गुन्हा दाखल
Pexels

Bhiwandi : लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या पतीचा प्रेयसीच्या साथीने बायकोवर हल्ला; हल्लेखोर नवऱ्यासह प्रेयसीवर गुन्हा दाखल

बायकोने माझी माहेरी बदनामी का करता असा जाब विचारल्याच्या वादातून लिव्ह-इन मध्ये राहणाऱ्या नवऱ्याने प्रेयसीशी संगनमत करून बायकोवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना...
Published on

भिवंडी : बायकोने माझी माहेरी बदनामी का करता असा जाब विचारल्याच्या वादातून लिव्ह-इन मध्ये राहणाऱ्या नवऱ्याने प्रेयसीशी संगनमत करून बायकोवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील  मानकोली गावात घडली आहे. या हल्ल्याप्रकरणी पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून लिव्ह-इन मधील नवऱ्यासोबत राहणाऱ्या प्रेयसीसह नवऱ्यावर नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश शिनवार माळी (३२) आणि त्याची प्रेयसी गौरी लक्ष्मण पाटील ( २०) अशी गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोरांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नवरा सुरेश आणि २८ वर्षीय तक्रारदार महिलेचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला असून हे दोघे भिवंडी तालुक्यातील मानकोली गावात राहत आहेत. मात्र विवाहानंतर काही महिन्यातच आरोपी सुरेशचे गौरीशी प्रेमाचे सुत जुळले होते. या दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती पिडीत विवाहितेला मिळाल्याने  नवरा सुरेश  आणि जखमी बायकोमध्ये  वाद सुरू होते. तर, दुसरीकडे तक्रारदार बायको आणि आरोपी नवरा सुरेश यांचा घटस्फोटाचा खटला न्यायालयात  प्रलंबित असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. त्यातच आरोपी सुरेश हा तक्रारदार बायकोच्या आईला व बहिणीला मोबाईलवर संपर्क करून पिडीत बायकोबद्दल उलट सुलट सांगून शिवीगाळ करत तिची बदनामी करीत होता. २९ जुलै रोजी तक्रारदार बायकोने नवरा सुरेशला याचा जाब विचारताच त्याने प्रेयसी गौरीशी संगनमत करून लोखंडी दांड्याने बायकोच्या पाठीवर मारून तिला गंभीर जखमी केले. याप्रकरणी पीडित बायकोच्या  तक्रारीवरून सुरेश आणि त्याच्या प्रेयसीविरोधात नारपोली पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम ११८(१),३५२ सह म.पो.अधिनियमान्वये ३७ (१) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोऊनि सायली शिंदे करीत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in