भिवंडीत १००८ दिव्यांचा दीपोत्सव ठरले आकर्षण

दिवाळीनिमित्त भिवंडीतील मानसरोवर परिसरात प्रथमच दीपसंध्या या दिवाळी संध्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट व कृष्णा फाउंडेशनच्या वतीने स्वीकृत नगरसेवक गिरीश म्हात्रे व सुमित बाळ्या मामा म्हात्रे यांच्या वतीने शनिवारी करण्यात आले होते.
भिवंडीत १००८ दिव्यांचा दीपोत्सव ठरले आकर्षण
भिवंडीत १००८ दिव्यांचा दीपोत्सव ठरले आकर्षण
Published on: 

भिवंडी: दिवाळीनिमित्त भिवंडीतील मानसरोवर परिसरात प्रथमच दीपसंध्या या दिवाळी संध्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट व कृष्णा फाउंडेशनच्या वतीने स्वीकृत नगरसेवक गिरीश म्हात्रे व सुमित बाळ्या मामा म्हात्रे यांच्या वतीने शनिवारी करण्यात आले होते.

या कार्यक्रमात १००८ दिव्यांचा भव्य दीपोत्सव आणि काशी येथून आलेल्या पंडितांच्या हस्ते पार पडलेली गंगा आरती हे विशेष आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. दिव्यांच्या लखलखाटात आणि मंत्रोच्चारांच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.तर मराठी भावमधुर गीताने परिसरात वेगळाच जल्लोष निर्माण झाला होता.भिवंडीतील मानसरोवर परिसरात वऱ्हाळदेवी मंदिराच्या तलावाच्या किनारी हा कार्यक्रम संपन्न झाला.

भारतीय संस्कृती आणि धार्मिक परंपरा जपण्याच्या उद्देशाने आयोजित या सोहळ्यात परिसरातील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.विशेष म्हणजे या कार्यक्रमात महिलांचा सन्मान करत त्यांचा सत्कारही करण्यात आला.

दीपावली हा आनंदाचा उत्साहाचा सण साजरा करताना हिंदू सण आणि संस्कृतीची जोपासना करणे या एकमेव उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन भिवंडी शहरात करीत आहोत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)