भिवंडीत दोन गटांत हाणामारी; गोळीबार, चॉपरनेही हल्ला; ११ जणांना अटक

हॉटेलमध्ये सुरू असलेले गाणे बदलण्याच्या कारणावरून दोन गटांत झालेल्या वादाचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले. या वेळी पिस्तूलमधून गोळीबार केल्याचा तसेच चॉपरने हल्ला केल्याचा प्रकार मुंबई-नाशिक महामार्गावरील सोनाळे येथील त्विशा हॉटेलमध्ये मध्यरात्री घडला.
भिवंडीत दोन गटांत हाणामारी; गोळीबार, चॉपरनेही हल्ला; ११ जणांना अटक
भिवंडीत दोन गटांत हाणामारी; गोळीबार, चॉपरनेही हल्ला; ११ जणांना अटक
Published on: 

भिवंडी : हॉटेलमध्ये सुरू असलेले गाणे बदलण्याच्या कारणावरून दोन गटांत झालेल्या वादाचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले. या वेळी पिस्तूलमधून गोळीबार केल्याचा तसेच चॉपरने हल्ला केल्याचा प्रकार मुंबई-नाशिक महामार्गावरील सोनाळे येथील त्विशा हॉटेलमध्ये मध्यरात्री घडला. या घटनेचे सीसीटीव्ही दृश्य समाजमाध्यमांवर प्रसारित झाले आहे.

हॉटेलमध्ये गाणे सुरू असताना एका गटाने ते बंद करून मराठी गाणे लावण्याची मागणी केली. त्यावरून दुसऱ्या गटाने हरकत घेतली. साऊंड बॉक्स दुसऱ्या टेबलाजवळ नेण्यावरून वाद वाढला.

सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची आणि शिवीगाळ झाली. त्यानंतर दोन्ही गटांत मारहाण सुरू झाली. यावेळी साईनाथ पाटील याने पिस्तूल काढून गोळीबार केल्याचा आरोप आहे, तर दुसऱ्या गटाच्या तक्रारीनुसार, चॉपरने हल्ला करण्यात आला.

या झटापटीत काहीजण जखमी झाले. या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही गटांतील एकूण ११ जणांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास भिवंडी तालुका पोलीस करीत आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)