Bhiwandi : लूम कामगारांची गोदामातील कामाला पसंती; स्थलांतर आणि महागाईमुळे खानावळ व्यवसायाला फटका

आतापर्यंत एका खानावळीमध्ये सुमारे ३० कामगार कमी झाले आहेत. २०२२ मध्ये खानावळीतील १५ दिवसांचे जेवण प्रति माणूस १,००० रुपयांवर उपलब्ध होते, तर आता २०० रुपयांनी वाढ करून १,२०० रुपये आकारले जात आहेत. यामुळे कामगारांनी खानावळीच्या जेवणाकडे पाठ फिरवली आहे, असे खानावळी मालकांनी सांगितले.
लूम कामगारांची गोदामातील कामाला पसंती; स्थलांतर आणि महागाईमुळे खानावळ व्यवसायाला फटका
लूम कामगारांची गोदामातील कामाला पसंती; स्थलांतर आणि महागाईमुळे खानावळ व्यवसायाला फटका
Published on

सुमित घरत/भिवंडी

जगभरात यंत्रमाग नगरी म्हणून ओळख असलेल्या भिवंडीतील यंत्रमाग कारखान्यांमध्ये कोरोनानंतर मंदीचे चित्र हळूहळू समोर येत आहे. यामध्ये खास करून कारखान्यातील सततची होणारी दगदग आणि वाढती महागाई यामुळे लूम कामगार गोदामातील कामाला प्राधान्य देत आहेत, ज्याचा थेट फटका खानावळी (भिसी) व्यवसायाला बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एका खानावळीमध्ये सुमारे ३० कामगार कमी झाले आहेत. २०२२ मध्ये खानावळीतील १५ दिवसांचे जेवण प्रति माणूस १,००० रुपयांवर उपलब्ध होते, तर आता २०० रुपयांनी वाढ करून १,२०० रुपये आकारले जात आहेत. यामुळे कामगारांनी खानावळीच्या जेवणाकडे पाठ फिरवली आहे, असे खानावळी मालकांनी सांगितले. खानावळीचे जेवण १ भाजी, ५-६ चपाती आणि भात यांचा समावेश असलेले असून पूर्णपणे उधारीवर चालते. काही कामगार पैसे न देता पलायन केल्यामुळे मालकांना आर्थिक भुर्दंडाचा सामना करावा लागत आहे.

सध्या नोव्हेंबरमध्ये परप्रांतीय कामगार विवाह आणि अन्य कार्यक्रमांसाठी स्थलांतर करत असल्यामुळे खानावळी व्यवसायात आणखी मंदी आली आहे. तथापि, कामगारांच्या पुनरागमनामुळे भिसी व्यवसायाला काही प्रमाणात दिलासा मिळतो. सन १९३० पासून हातमाग आणि यंत्रमाग कापड व्यवसायासाठी भिवंडी प्रसिद्ध असून, देशातील सुमारे ७ लाख पावरलूम येथे कार्यरत आहेत. भिवंडीला यामुळे 'पावरलूम सिटी' म्हणून ओळखले जाते.

लूम कामगारांची गोदामातील कामाला पसंती; स्थलांतर आणि महागाईमुळे खानावळ व्यवसायाला फटका
लूम कामगारांची गोदामातील कामाला पसंती; स्थलांतर आणि महागाईमुळे खानावळ व्यवसायाला फटका

कुटुंबीयांपासून दूर राहणारे ८-१० कामगार झोपडपट्टीमध्ये भाड्याने लहान खोल्यांमध्ये राहतात. येथे अनेक भिसी-खानावळी चालतात, परंतु अन्नपदार्थाची गुणवत्ता नेहमीच प्रश्नाखाली असते. तब्बल १८ वर्षांपूर्वी एक दुर्घटना झाली होती, ज्यात १२० कामगारांना विषबाधा झाली होती. या घटनेनंतर खानावळीतील अन्नपदार्थ आणि सुविधा सुधारणे आवश्यक असल्याचे सांगितले गेले, मात्र आजही परिस्थिती फारशी बदललेली नाही.

भिवंडी तालुक्यातील खानावळी व्यवसायावर यंत्रमाग कारखान्यांतील मंदी आणि परप्रांतीय कामगारांच्या गोदामातील पसंतीमुळे घरघर चालल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

बबलू शेख, खानावळी मालक, काटई बाग (भिवंडी)

अनेक खानावळी आजही बंद

लूम व्यवसायावर महागाई, नोटबंदी, जीएसटी आणि वीज दरातील वाढ यामुळे आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. कोरोनाच्या काळात यंत्रमाग व्यवसाय ठप्प झाल्यामुळे लाखो कामगार भिवंडीहून मूळ गावाकडे परत गेले होते. लॉकडाऊननंतरही व्यवसायात अपेक्षित तेजी न आल्यामुळे अनेक खानावळी आजही बंद आहेत. भिवंडीतील यंत्रमाग कारखान्यांची संख्या मर्यादित झाल्याने शहरातील शेकडो खानावळींवर थेट परिणाम झाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in