भिवंडी : महिला विनयभंगप्रकरणी तिघांना अटक

जुन्या भांडणाच्या रागातून ६ जणांनी आपसात संगनमताने महिलेच्या घरात शिरून तिला शिवीगाळ करीत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिला मारहाण केल्याची संतापजनक घटना
बेकायदा भारतीय पासपोर्टसह बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक
बेकायदा भारतीय पासपोर्टसह बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक
Published on

भिवंडी : जुन्या भांडणाच्या रागातून ६ जणांनी आपसात संगनमताने महिलेच्या घरात शिरून तिला शिवीगाळ करीत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिला मारहाण केल्याची संतापजनक घटना भिवंडीतील एका चाळीतून समोर आली आहे. याप्रकरणी निजामपूरा पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

इक्बाल नबी अहमद अन्सारी (३८), इरफान अहमद नबी अहमद अन्सारी (४४), अरसलान इरफान अहमद अन्सारी (१८) अशी केलेल्यांची नावे आहेत. तर बेबी अन्सारी, शन्नो अन्सारी, नन्नी अन्सारी या तिघांना समजपत्र देण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास संगमपाड्यातील बबन चष्मावाली चाळीत राहणारी मीना (बदलले नाव) हीचा मोठा मुलगा हा आदर्श पार्क येथे गेला होता, तर मीना ही तिचा छोटा मुलगा गौतमसोबत घरी होती. त्यावेळी जुन्या भांडणाच्या रागातून प्रथम अटक आरोपींनी मीनाचा विनयभंग करीत शिवीगाळीसह आपसात संगनमताने तिला मारहाण केली.

याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून सहा जणांवर भादंविच्या कलम ३५४ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करून तिघांना समजपत्र देण्यात आले आहे. पुढील तपास पोऊनि एस. एन. मोटे करीत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in