Bhiwandi : माजी महापौर विलास पाटील यांना अटकपूर्व जामीन; महापौर निवडणुकीला नवे वळण

कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील आणि त्यांचा मुलगा, नगरसेवक मयुरेश पाटील यांना भिवंडी न्यायालयाने शनिवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला. या निर्णयामुळे आगामी महापौर निवडणुकीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले असून चुरस अधिक वाढली आहे.
Bhiwandi : माजी महापौर विलास पाटील यांना अटकपूर्व जामीन; महापौर निवडणुकीला नवे वळण
Bhiwandi : माजी महापौर विलास पाटील यांना अटकपूर्व जामीन; महापौर निवडणुकीला नवे वळणX
Published on

भिवंडी : कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील आणि त्यांचा मुलगा, नगरसेवक मयुरेश पाटील यांना भिवंडी न्यायालयाने शनिवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला. या निर्णयामुळे आगामी महापौर निवडणुकीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले असून चुरस अधिक वाढली आहे. भिवंडी महापालिका निवडणुकीनंतर कोणार्क विकास आघाडीचे समर्थक आणि भाजप आमदार महेश चौघुले यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. या घटनेप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात दोन्ही गटांतील सुमारे ५१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात विलास पाटील आणि मयुरेश पाटील यांचाही समावेश होता.

दरम्यान, शुक्रवारी भाजपकडून नारायण चौधरी यांच्या नावाची महापौरपदासाठी अधिकृत घोषणा करण्यात आली. मात्र या घोषणेनंतर भाजप नगरसेवक आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे पुतणे सुमित पाटील यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत मतभेद उघड झाल्याचे बोलले जात आहे.

या सर्व घडामोडींमध्ये विलास पाटील यांना मिळालेल्या अटकपूर्व जामिनामुळे महापौर निवडणुकीतील राजकीय रंगत आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, कोणार्क विकास आघाडीतील २३ जणांना तसेच भाजपच्या ३ जणांना अशा एकूण २६ जणांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात पुन्हा हालचालींना वेग आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in