भिवंडीतून तीन अल्पवयीन बेपत्ता; दोन मुलींचा समावेश

भिवंडी शहरात अल्पवयीन मुला-मुलींच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे वयात आलेल्या मुला-मुलींच्या सुरक्षिततेची चिंता पालक वर्गात वाढली आहे.
भिवंडीतून तीन अल्पवयीन बेपत्ता; दोन मुलींचा समावेश
Published on

भिवंडी : भिवंडी शहरात अल्पवयीन मुला-मुलींच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे वयात आलेल्या मुला-मुलींच्या सुरक्षिततेची चिंता पालक वर्गात वाढली आहे. रविवारी एकाच दिवशी भिवंडी शहरात तीन अल्पवयीन बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या असून यापैकी दोन अल्पवयीन मुली आहेत.

भिवंडी शहर पोलिस ठाणे हद्दीतील भाग्यनगर कामतघर येथील चाळीत राहणाऱ्या रंजुदेवी महेश झा यांची १६ वर्षे वयाची मुलगी रोशनी ही सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास आईला कामावर मदत करायला जात असल्याचे सांगून गेली ती घरी परतलीच नाही. हताश पालकांनी भिवंडी शहर पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली आहे. दुसरी घटना भोईवाडा पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. ईदगाह परिसरातील झोपडपट्टीत राहणारे मोहम्मद हानिफ शमशुद्दीन शेख यांची १६ वर्षे ९ महिने वयाची मुलगी नूरी गौसिया ही दुपारी दोन वाजता दुकानात खाऊ घेण्यासाठी गेली ती पुन्हा घरी परतली नाही. तिसरी घटना शांतीनगर पोलीस ठाणे क्षेत्रात घडली. खान कंपाऊंड परिसरातील चाळीत राहणाऱ्या सबिना नौशाद अन्सारी यांचा १७ वर्षे ९ महिने वयाचा हसन नौशाद हा मुलगा २२ एप्रिल रोजी दुपारी एक वाजता काम शोधण्यासाठी मुलुंड येथे जात असल्याचे सांगून गेला परंतु तो पुन्हा घरी परतलाच नाही.

logo
marathi.freepressjournal.in