

सुमित घरत/भिवंडी
स्थानीय स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर भिवंडी महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत आज (मंगळवार) आयुक्त अनमोल सागर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. अंजूर फाटा येथील भिवंडी रेल्वे स्टेशनजवळील मानसी भारत गडा महाविद्यालयाच्या सभागृहात ही प्रक्रिया मोठ्या पारदर्शकतेने संपन्न झाली.
एकूण २३ प्रभागांतील ९० नगरसेवक पदांकरिता आरक्षण निश्चित करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठीद्वारे आरक्षण सोडत काढण्यात आली. या प्रक्रियेत ९० पैकी ४५ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून, महिला आरक्षणाचे प्रमाण अचूक ५० टक्के झाले आहे. त्यामुळे आगामी भिवंडी महापालिका निवडणुकीत “महिलाराज” पाहायला मिळण्याची शक्यता अधिक दृढ झाली आहे.
प्रवर्गनिहाय आरक्षणाचा तपशील
अनुसूचित जाती (SC) - ३ जागा त्यापैकी २ जागा महिला प्रवर्गासाठी राखीव
अनुसूचित जमाती (ST) - १ सर्वसाधारण ST जागा आरक्षित
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (OBC) - २४ जागा, त्यातील १२ जागा OBC महिला यांच्यासाठी राखीव
सर्वसाधारण (Open) - ६२ जागा, त्यातील ३१ जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव
यामुळे सर्व प्रवर्गांमध्ये महिला उमेदवारांना संतुलित आणि व्यापक प्रतिनिधित्व मिळणार आहे.