
भिवंडी : भिवंडी महानगरपालिकेचे सन २०२४-२५ चे १००२ कोटी २३ लाख ८० हजार रुपयांचे सुधारीत तर सन २०२५-२६ १०९७ कोटी ४९ लाख ७९ हजार रुपयांची तरतूद तर ९ लाख ६९ हजार शिल्लक दर्शविणारा अर्थसंकल्प मुख्य लेखा व वित्त अधिकारी रामप्रसाद सोळुंके यांनी प्रशासक तथा आयुक्त अनमोल सागर यांना सोमवारी सादर केला.
अर्थसंकल्पावर भाष्य करताना आयुक्त अनमोल सागर यांनी स्पष्ट केले की, केले की शहराच्या विकास कामांकरिता निधीची आवश्यता व महानगरपालिकेचे उत्पन्न याचा ताळमेळ घेऊन सर्वप्रथम १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने येणाऱ्या वर्षाकरिता प्रशासकीय तरतुदीसह सीएसआर फंडातून काही निधी उभारण्याचे प्रयत्न आहेत. शहर सौंदर्याकरण व सुशोभिकरण करणे यासाठी भिवंडी शहरामध्ये मोठा वाव आहे. त्या अनुषंगाने आवश्यतप्रमाणे तरतूद करुन सर्वांच्या सहकार्याने सुशोभिकरणा साठी मोहिम राबविण्यात येणार असून त्यासाठी टास्क फोर्स तयार करण्यात आले आहे व त्यांच्या नियमितपणे बैठका घेण्यात येतील.
भिवंडी महापालिकेमध्ये कर वसूलीसाठी विशेष लक्ष देण्यात आले नव्हते की जे महापालिकेचे उत्पन्नाचे महत्त्वाचे स्त्रोत आहे. संपूर्ण प्रशासनाकडून सहकार्य करुन जास्तीत जास्त वसूलीकरिता प्रयत्न करणार जेणेकरुन वसूलीमध्ये वाढ होईल. बीजीपी दवाखान्यामध्ये ओ.पी.डी. सुरू झाली असून त्याठिकाणी सुसज्ज रुग्णालय सुरु करायचे आहे. याचा मुख्य उद्देश नागरिकांना आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध होतील त्याचबरोबर घरी होणारे बाळंतपणाची संख्या कमी होणार आहे. पाणी पुरवठा शहरा मध्ये समप्रमाणात व योग्य प्रकारे होण्यासाठी १०० द.ल.लि.योजना सुरु होणार आहे व ती यशस्वी झाल्यानतर भिवंडी शहराचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न निकाली निघेल. भुयारी गटार योजना व पाणी पुरवठ्याच्या इतर योजना व सुविधांसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. शिक्षण विभागाकरिता डिजिटल क्लासरुम शासनाच्या सहकार्याने उभारणे कामीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये प्रगती करण्यासाठी तरतूद ठेवलेली आहे.
अर्थसंकल्प सादर करण्यापेक्षा त्याची तरतुदीनुसार व योग्यप्रकारे अंमलबजावणी करणे हे महत्त्वाचे आहे. कामाची आवश्यकता व निकड भासल्यास पुनर्विनियोजन करण्यास प्राधान्य देण्यात येईल. कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक बाबी परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने ई.एच.आर.एम.एस. आज्ञाप्रणाली विकसित करण्यात येईल.प्रशासनाच्या कामकाजाच्या दृष्टीकोनातून सुव्यवस्थापन व पारदर्शकता येण्याकरिता ई-ऑफिस आज्ञाप्रणाली विकसित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. शहरातील उद्याने व स्मशानभूमी यांचे पर्यावरण पूरक संवर्धन करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
शहरातील पदपाथ यांचे सुव्यवस्थापन व सुशोभिकरण करण्यासह वाहतूक व्यवस्था सुनियंत्रित करुन शहरातील प्रमुख चौकांचे सुशोभिकरण करणे हे प्रमुख उद्दिष्ट या अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले आहेत.या
बैठकीस अतिरीक्त आयुक्त देविदास पवार, अतिरीक्त आयुक्त विठ्ठल डाके,मुख्य लेखा व वित्त अधिकारी रामप्रसाद सोळुंके,उपायुक्त (मुख्यालय) रोहीदास दोरकुळकर,उपायुक्त (समाज कल्याण) प्रणाली घोंगे,उपायुक्त (शिक्षण) अनुराधा बाबर,उपायुक्त विक्रम दराडे, अंतर्गत लेखा परिक्षक नंदकुमार चौधरी आणि सर्व प्रभाग समितींचे सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.
जमा बाजू
आरंभीची शिल्लक
२५६ कोटी ७२ लाख ४ हजार
विकास निधी
१५ कोटी ३० लाख ,
इतर उत्पन्न व दायित्व
९० कोटी ३७ लाख ६४ हजार
मालमत्ता व पाणीपट्टी कर
९७ कोटी ९६ लाख,
जीएसटी अनुदान
३९८ कोटी ७८ लाख ५ हजार
भांडवली उत्पन्न
२३८ कोटी ३६ लाख ६ हजार
खर्च बाजू
पाणीपुरवठा
२०१ कोटी ४३ लाख ९८ हजार
कर्मचारी वेतन
३७५ कोटी २० लाख ८३ हजार
सार्वजनिक बांधकाम
१०८ कोटी ८२ लाख ३५ हजार
आरोग्य सुविधा
३८ कोटी ६९ लाख ३ हजार
इतर भांडवली खर्च
३२९ कोटी ४ लाख ६७ हजार
विद्युत
३२ कोटी ३३ लाख २४ हजार
वाहने :- ५ कोटी ३५ लाख
संगणक:- २ कोटी
अग्निशमन:- 2 कोटी 46 लाख
उद्यान :- २ कोटी ५ लाख