Bhiwandi-Nizampur Civic Polls 2026 : भिवंडीत ९० जागांसाठी १०३३ उमेदवार

भिवंडी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मंगळवारी शेवटच्या दिवशी ७६३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. एकूण ९० जागांसाठी आतापर्यंत १०३३ अर्ज नोंदवले गेले आहेत. येत्या दोन दिवसांत उमेदवारांची मनधरणी करण्यात यश मिळाल्यानंतर खरे निवडणूक चित्र स्पष्ट होणार आहे.
Bhiwandi-Nizampur Civic Polls 2026 :  भिवंडीत ९० जागांसाठी १०३३ उमेदवार
संग्रहित छायाचित्र
Published on

भिवंडी : भिवंडी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मंगळवारी शेवटच्या दिवशी ७६३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. एकूण ९० जागांसाठी आतापर्यंत १०३३ अर्ज नोंदवले गेले आहेत. येत्या दोन दिवसांत उमेदवारांची मनधरणी करण्यात यश मिळाल्यानंतर खरे निवडणूक चित्र स्पष्ट होणार आहे.

भिवंडीत एकूण सात निवडणूक निर्णय अधिकारी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यालय करत आहेत. शेवटच्या दिवशी आणि एकूण अर्जांची माहिती खालीलप्रमाणे आहे:

  • निर्णय अधिकारी क्रमांक १: शेवटच्या दिवशी १०४, एकूण ११७

  • निर्णय अधिकारी क्रमांक २: शेवटच्या दिवशी ९३, एकूण ११५

  • निर्णय अधिकारी क्रमांक ३: शेवटच्या दिवशी १७८, एकूण २०३

  • निर्णय अधिकारी क्रमांक ४: शेवटच्या दिवशी १३३, एकूण २२१

  • निर्णय अधिकारी क्रमांक ५: शेवटच्या दिवशी ७४, एकूण १३२

  • निर्णय अधिकारी क्रमांक ६: शेवटच्या दिवशी ७६, एकूण १२६

  • निर्णय अधिकारी क्रमांक ७: शेवटच्या दिवशी १०५, एकूण ११९

सर्व प्रभागांमध्ये जोरदार लढत होणार आहे. अनेक प्रभागांमध्ये दुरंगी लढत पाहायला मिळणार आहे, तर काही ठिकाणी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in