भिवंडीत शॉरमा खाल्ल्याने ११ जणांना विषबाधा; ठाण्यात FDA, पालिकेकडून चौकशी सुरू

भिवंडीत शॉरमा खाल्ल्यानंतर संशयित अन्नविषबाधेमुळे गर्भवती महिलेसह ११ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी रात्री घडल्याची माहिती एका अधिकाऱ्याने मंगळवारी दिली.
भिवंडीत शॉरमा खाल्ल्याने ११ जणांना विषबाधा; ठाण्यात FDA, पालिकेकडून चौकशी सुरू
भिवंडीत शॉरमा खाल्ल्याने ११ जणांना विषबाधा; ठाण्यात FDA, पालिकेकडून चौकशी सुरू
Published on: 

ठाणे : भिवंडीत शॉरमा खाल्ल्यानंतर संशयित अन्नविषबाधेमुळे गर्भवती महिलेसह ११ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी रात्री घडल्याची माहिती एका अधिकाऱ्याने मंगळवारी दिली.

भिवंडीतील वंजारपट्टी नाका परिसरातील एका खाद्यपदार्थ विक्री केंद्रातून संबंधित व्यक्तींनी शावरमा खाल्ला होता. त्यानंतर त्यांना उलट्या, चक्कर येणे आणि जुलाब यांसारखे त्रास सुरू झाले, अशी माहिती भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी संदीप गाडेकर यांनी दिली.

शॉरमा खाल्ल्यानंतर काही जणांना आरोग्यविषयक त्रास जाणवू लागला. त्यापैकी गर्भवती महिलेसह ११ जणांना भिवंडीतील इंदिरा गांधी स्मृती (आयजीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

रुग्णालयात दाखल असलेल्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. रुग्णांच्या मलाचे नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी संबंधित खाद्यपदार्थ विक्री केंद्रावर धाव घेऊन तपासणी आणि चौकशी सुरू केली आहे. स्थानिक पोलिसांकडूनही या घटनेचा तपास करण्यात येत आहे.

महानगरपालिकेचा आरोग्य विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे गाडेकर यांनी सांगितले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)