भिवंडी : विवाहितेचा छळ; सासरच्यांवर गुन्हा

विवाहितेने माहेरहून हुंडा स्वरूपात पैश्यांसह दुचाकी आणण्यासाठी सासरच्यांनी तगादा लावून किरकोळ कारणावरून विवाहितेस शिवीगाळ करण्यासह मारहाण केल्याची संतापजनक घटना शांतीनगर हद्दीतून समोर आली आहे.
भिवंडी : विवाहितेचा छळ; सासरच्यांवर गुन्हा
Published on

भिवंडी : विवाहितेने माहेरहून हुंडा स्वरूपात पैश्यांसह दुचाकी आणण्यासाठी सासरच्यांनी तगादा लावून किरकोळ कारणावरून विवाहितेस शिवीगाळ करण्यासह मारहाण केल्याची संतापजनक घटना शांतीनगर हद्दीतून समोर आली आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या १० जणांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पीडित ईरम फातीमा अमानुल्ला अन्सारी (२७) ही शांतीनगर परिसरातील संजय नगरमध्ये राहत असून तिचे कणेरीतील समदनगरमधील मोहम्मद आसीफ मोहम्मद उमर शेख याच्याशी २०१८ मध्ये लग्न झाले. सासू रुकसाना शेख, सासरे मो. तसलीम शेख, नणंद हरम मो. उमर शेख, मुस्कान शेख, अनम शेख, परवीन मो. शेख, नंदोई मोईद शेख, नणंद हिना रियाज शेख,नंदोई रियाज शेख या सासरच्या मंडळींनी इरमच्या माहेरच्यांनी लग्नात हुंडा म्हणून २ लाख रुपये आणि दुचाकी द्यावी, या मागणीसाठी पीडितेकडे तगादा लावला होता. त्यास इरमने नकार दिला असता सासरच्या मंडळीने क्षुल्लक कारणावरून पीडितेला वारंवार शिवीगाळ केल्याची घटना घडली.

तसेच मारहाण करून मारण्याची धमकी देवून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला आहे. याप्रकरणी ६ जानेवारी रोजी पीडित इरमच्या फिर्यादीवरून सासरच्या मंडळीवर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पोउनि सचिन कुचेकर करीत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in