वाहतूककोंडीविरोधात विद्यार्थी रस्त्यावर

भिवंडी-ठाणे महामार्ग महामार्गावरील अंजुर फाटा ते कशेळी या भागात दररोजची वाहतूककोंडी होत असल्याने असंख्य वाहन चालक, नागरिक, विद्यार्थी स्थानिक ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
वाहतूककोंडीविरोधात विद्यार्थी रस्त्यावर
Published on

भिवंडी : भिवंडी-ठाणे महामार्ग महामार्गावरील अंजुर फाटा ते कशेळी या भागात दररोजची वाहतूककोंडी होत असल्याने असंख्य वाहन चालक, नागरिक, विद्यार्थी स्थानिक ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या दररोजच्या वाहतूककोंडीला कंटाळून काल्हेर येथील परशुराम धोंडू टावरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सायंकाळी चार वाजता रस्त्यावर उतरून अभूतपूर्व असा रास्तारोको आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी तब्बल दोन तास रस्ता रोखून धरला. अंजुर फाटा ते काल्हेर या मार्गावर स्थानिक राहनाळ, पुर्णा, काल्हेर येथील ग्रामस्थांना दररोज वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. या वाहतूककोंडीमुळे असंख्य चाकरमानी प्रवासी तसेच विद्यार्थ्यांना वेळेवर कर्तव्यस्थानी पोहोचण्यासाठी कसरत करावी लागते. शाळा सुटल्यावर दोन किलोमीटर अंतरावरील घरी पोहचण्यासाठी दोन ते तीन तास लागत आहेत.

या दररोजच्या त्रासाला कंटाळून अखेर काल्हेर येथील परशुराम टावरे माध्यमिक विद्यालय व माधवराव पाटील बालमंदिर येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे शाळे बाहेरील रस्त्यावर उतरून रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचा तब्बल तीन तास खोळंबा झाला होता.

logo
marathi.freepressjournal.in