Thane : मुलाच्या जन्मानंतर खर्च वाढल्यामुळे पत्नीला घरातून हाकलले; पतीवर गुन्हा दाखल

मुलाच्या जन्मानंतर वाढलेल्या खर्चामुळे संतापलेल्या पतीने आपल्या पत्नीलाच घराबाहेर काढण्याचा प्रकार उघड झाला आहे.
Thane : मुलाच्या जन्मानंतर खर्च वाढल्यामुळे पत्नीला घरातून हाकलले; पतीवर गुन्हा दाखल
Published on

भिवंडी : मुलाच्या जन्मानंतर वाढलेल्या खर्चामुळे संतापलेल्या पतीने आपल्या पत्नीलाच घराबाहेर काढण्याचा प्रकार उघड झाला आहे.

तरुणीचे २०१८ मध्ये लग्न झाले होते. तिला सप्टेंबर २०२५ मध्ये मुलगा झाला. मूल झाल्यानंतर खर्च वाढला. संतापलेल्या पतीने पत्नीला मारहाण करून हाकलून दिल्याची घटना समोर आली. याप्रकरणी पतीच्या विरोधात भिवंडीतील भोईवाडा पोलीस ठाण्यात पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फकरुद्दीन इब्राहिम शेख (३६ रा.गोवंडी) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,भोईवाडा पोलिस ठाणे हद्दीत राहणाऱ्या पीडित ३२ वर्षीय विवाहितेचे फकरुददीन याच्याशी ३ सप्टेंबर २०१८ मध्ये लग्न झाले होते. सुरुवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर कालांतराने त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून खटके उडत होते. सप्टेंबर २०२५ रोजी पीडितेला मुलगा झाला. पीडिता ७ सप्टेंबर रोजी हॉस्पिटल मधून डिस्चार्ज घेऊन घरी आल्यानंतर फकरुद्दीनने पीडितेला खर्च जास्त झाल्याचे सांगून माहेरहून पैसे घेवून येण्यासाठी तगादा लावून तिला शिवीगाळसह मारहाण करीत १६ ऑक्टोबर रोजी घराबाहेर हाकलून दिले आहे. तसेच पीडितेला व तिच्या मुलाला खर्चासाठी पैसे देणे बंद करून पीडितेने पैश्यांची मागणी केली.

logo
marathi.freepressjournal.in