ठाणे
भूमिपुत्र संघटना लढवणार कल्याण लोकसभा निवडणूक
ठाणे पंचक्रोशीतील भूमिपुत्र संघटनांनी एकत्र येत भूमिपुत्रांवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी कल्याण लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे...
डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी स्थानिक भूमिपुत्र उमेदवार असावा अशी येथील भूमिपुत्रांची अपेक्षा होती. परंतु कोणत्याही पक्षाने याकडे लक्ष दिले नाही,म्हणूनच ठाणे पंचक्रोशीतील भूमिपुत्र संघटनांनी एकत्र येत भूमिपुत्रांवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी कल्याण लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेतील सामाजिक कार्यकर्ते मोतीराम गोंधळी अपक्ष म्हणून अर्ज भरणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
मंगळवारी श्री कालिका माता मंदिर निळजेगाव येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी मोतीराम दादा गोंधळी,भूमिपुत्र धर्माभिमानी संघटनेचे अधक्ष महेंद्र सर पाटील, भालचंद्र पाटील, मंगेश भोईर,श्री मलंग मुक्ती आंदोलनाचे राजेश गायकर, ओमकार पावशे, रोशन भोईर, रविंद्र पाटील, कल्पेश पाटील, गोरखनाथ पाटील हे उपस्थित होते.