बदलापुरात शिवसेनेचा बालेकिल्ला भुईसपाट, २५ नगरसेवक शिंदे गटात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील ‘नंदनवन’ या निवासस्थानी नगरसेवकांच्या प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
बदलापुरात शिवसेनेचा बालेकिल्ला भुईसपाट, २५ नगरसेवक शिंदे गटात

बदलापुरातील शिवसेनेच्या २५ नगरसेवकांनी शिंदे गटाला समर्थन दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. यामुळे बदलापुरात शिवसेनेचा बालेकिल्ला भुईसपाट झाल्याचे मानण्यात येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील ‘नंदनवन’ या निवासस्थानी नगरसेवकांच्या प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बदलापुरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नगरसेवकांच्या वतीने एकनाथ शिंदे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. एकनाथ शिंदे यांनीही सर्व नगरसेवकांचे शिंदे गटात स्वागत केले. आपल्या समर्थनाबद्दल आभारी आहे, महाराष्ट्राच्या प्रगतीचे काम आपल्या हातून घडेल, अशी ग्वाही त्यांनी शिवसैनिकांना दिली.

शिवसेना बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी आपल्या समर्थक २५ नगरसेवकांसह शिंदे गटाला समर्थन दिले आहे. आमच्या प्रश्नांकडे आणि मागण्यांकडे आपण जातीने लक्ष द्याल, हा विश्वास वाटत असल्याने आम्ही आपणास पाठिंबा देत असल्याचे २५ नगरसेवकांच्या वतीने वामन म्हात्रे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही मान डोलावून समर्थन दिले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in