ठाकुर्ली कल्याण दरम्यान मोठी दुर्घटना ; हातातून निसटल्याने चार महिन्याचं बाळ गेलं वाहून

आपल्या डोळ्यासमोर आपलं बाळ वाहून गेल्यानं त्या बाळाच्या आईने मोठा आक्रोश केला आहे
ठाकुर्ली कल्याण दरम्यान मोठी दुर्घटना ;  हातातून निसटल्याने चार महिन्याचं बाळ गेलं वाहून

मुंबईसह उपनगरात कालपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली आहे. त्यात अंबरनाथ लोकल सेवा बंद पडल्यान मोठी दुर्घटना घडली आहे.

अंबरनाथ लोकल ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान सुमारे २ तास उभी होती. यावेळी अनेक प्रवासी हे उतरुन कल्याणच्या दिशेने चालत जात होते. यावेळी एक चार महिन्याचं बाळ घेऊन एक काका आणि त्या बाळाची आई हे चालत होते. यावेळी मोठी हृदय द्रावक दुर्घटना घडली आहे. हे बाळ त्या काकांच्या हातून सटकले आणि वाहत असलेल्या पाण्यात वाहून गेलं.

ही घटना घडताच त्या बाळाच्या आईने मोठा आक्रोश केला. लोकल उभी असल्याने त्या लोकच्या बाजूनं त्या बाळाची आई आणि काका चालत निघाले होते. मात्र, याच वेळी त्यांच्या हातातून बाळ सटकलं आणि पुराच्या पाण्यात वाहून गेलं.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in