मोखाडा शहरातील प्रवेशद्वारावरील रस्त्यावर मोठमोठाले खड्डे

रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या स्वागतासाठी खड्ड्यांची रांगोळीच काढले की काय, असा भास होत आहे.
मोखाडा शहरातील प्रवेशद्वारावरील रस्त्यावर मोठमोठाले खड्डे

जव्हार फाट्याहून मोखाडा शहरात येताना या दोन किमीच्या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले असून शहरात प्रवेश करताना रस्त्याची चाळण झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे जणु या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या स्वागतासाठी खड्ड्यांची रांगोळीच काढले की काय, असा भास होत आहे.

कोणत्याही गाव पाड्याचा विकास होण्याच्या दृष्टीने दळणवळण महत्त्वाची भूमिका बजावत असते. कोणत्याही प्रकारच्या देवाणघेवाणी करीता ये-जा करण्यासाठी रस्ता अतिशय महत्त्वाचा भाग समजला जातो. परंतु या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असताना रस्ते जास्त काळ टिकण्यासाठी उपाययोजना का केल्या जात नाही? हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मते अजूनही गुलदस्त्यातच आहे.

पर्यटन वाढीच्या दृष्टीने शहरातीच्या सुरुवातीच्या भागातच येथील तलाव सुशोभीकरण करण्यात आला. अनेक नागरिक सायंकाळी आपला वेळ या ठिकाणी घालवीत असतात, परंतु मोठ मोठाले खड्डे पडले असल्याने, वृद्ध बालक आणि महिला या रस्त्यातील खड्ड्यातून जात असताना त्यांची नामुष्की होत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in