टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

या घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनाकरिता इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवला आहे.
टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

भिवंडी : भिवंडी-ठाणे मार्गावर टेम्पोखाली चिरडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय नारायण टावरे (३९) असे अपघातात मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,८ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास भिवंडी-ठाणे मार्गावरील जुना ठाणे आग्रा रोडवरील पूर्णा येथील आदिनाथ कॉम्प्लेक्स समोरील भाग्यश्री मिल्क एजन्सीजवळून मयत अजय त्याची दुचाकीवरून काल्हेर येथून भादवड येथे जात असताना टाटावरील चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून अजयच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यावेळी अजय दुचाकीवरून खाली पडल्याने टेम्पोच्या डाव्या बाजूचा चाक त्याच्या अंगावरून गेल्याने तो चिरडला गेला. या अपघातात अजय रक्तबंबाळ होऊन अतिरक्तस्त्रावाने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनाकरिता इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात मयताचा चुलत भाऊ यतीन सदानंद टावरे याच्या फिर्यादीवरून टेम्पोचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in