अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

मुंबई-नाशिक महामार्गावर अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने पुन्हा एकदा भीषण अपघात झाला
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावर अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मुलाच्या समोरच एका बापाचा मृत्यू झाला. यानंतर फरार झालेल्या चालकावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी घटनेची नोंद करून त्याचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील जोगेश्वरी परिसरात राहणारे मॅथ्यू डिसूझा (६७) हे त्यांचा मुलगा ऑस्टिन डिसोझा (२६) याच्यासह २१ फेब्रुवारी रोजी दुचाकीवरून मुंबई-नाशिक महामार्गावरून ठाण्याच्या दिशेने जात होते. दोघेही महामार्गाच्या ओवळी भागात येताच मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात पिता-पुत्र रस्त्यावर पडले आणि गंभीर दुखापत झाल्यामुळे मॅथ्यू यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा जखमी झाला आहे, तर अपघातानंतर चालक वाहनासह फरार झाला. जखमी मुलाच्या तक्रारीवरून नारपोली पोलिसांनी फरार अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. रस्त्याचे बांधकाम सुरू झाल्यामुळे या महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले असून त्यामुळे पादचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in