टाकाऊ निर्माल्यापासून बायोगॅस व खतनिर्मिती

निर्माल्य तलावात न टाकता ते स्वतंत्र व्यवस्था केलेल्या ठिकाणी टाकण्याचे आवाहन नगरपरिषदेतेतर्फे करण्यात आले होते
टाकाऊ निर्माल्यापासून बायोगॅस व खतनिर्मिती

उरण परिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश चतुर्थी ते अनंतचतुर्थीच्या काळात गणपती विसर्जन ठिकाणी गणपती विसर्जनासाठी भक्तांनी सोबत आणलेले निर्माल्य तलावात न टाकता निर्माल्य गोळा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. उरण नगरपरिषदेने विमला तलाव आणि भवरा तलाव येथील जमा झालेल्या निर्माल्यापासून बायोगॅस व खताची निर्मिती केली आहे.

जल,नैसर्गिक व मानवनिर्मित पाण्याचे स्त्रोताचे संवर्धन व सर्व्रेक्षण व्हावे ,तलावातील पाण्याचे प्रदूषण होवू नये हा उद्देश ठेउनच निर्माल्य तलावात न टाकता ते स्वतंत्र व्यवस्था केलेल्या ठिकाणी टाकण्याचे आवाहन नगरपरिषदेतेतर्फे करण्यात आले होते.

जेणे करून जमा केलेल्या निर्माल्यापासून बायो गॅस व खत निर्मिती केली जाईल अशी प्रतिक्रिया उरण नगरपरिषदेचे मुखाधिकारी संतोष माळी यांनी व्यक्त केली. या कामी उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी.

उरण तालुका भाजप अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, उरण शहर भाजपा अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, आरोग्य निरीक्षक हरेश तेजी, कनिष्ठ अभियंता झुंबर माने व कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in