जन्मदात्या पित्याने केली चिमुकलीची विष पाजून हत्या; उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू
प्रातिनिधिक छायाचित्र

जन्मदात्या पित्याने केली चिमुकलीची विष पाजून हत्या; उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू

व्यसनाच्या आहारी गेलेल्या पित्याने आपल्या तीन वर्षांच्या पोटच्या मुलीची विष पाजून हत्या केल्याची घटना १५ ऑगस्ट रोजी घडली आहे. ही घटना खोडाळा पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीमध्ये घडली.
Published on

मोखाडा : व्यसनाच्या आहारी गेलेल्या पित्याने आपल्या तीन वर्षांच्या पोटच्या मुलीची विष पाजून हत्या केल्याची घटना १५ ऑगस्ट रोजी घडली आहे. ही घटना खोडाळा पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीमध्ये घडली. तसेच या घटनेतील आरोपी पित्याचा देखील नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आदिनाथ राजाराम रोकडे (३४) असे पित्याचे नाव असून तो तीन वर्षांची मुलगी आणि पत्नी दीपालीसह मोखाड्यात राहत होता. आदिनाथ नेहमी दीपालीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण व शिवीगाळ करत असे. या जाचाला कंटाळून दीपाली नाशिक येथील आपल्या माहेरी निघून गेली होती.

माहेरी गेल्यानंतर आदिनाथ देखील तेथे पोहोचला. यावेळी मुलीचे काही बरेवाईट करीन अशी धमकी दीपालीला त्याने दिली. त्यानंतर आदिनाथ मुलीला घेऊन खोडाळा येथे आला होता. दरम्यान खोडाळा येथे आल्यानंतर आदिनाथने मुलगी परीला विष पाजून स्वत:देखील प्यायला. याप्रकरणी मुलीची प्रकृती गंभीर असल्याने तिला नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान परीचा नाशिक जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता, तर गुरुवार, २२ ऑगस्ट रोजी आदिनाथचाही मृत्यू झाला.

logo
marathi.freepressjournal.in