राज्य सरकारने इंधनावरील कर कमी करण्याची भाजयमोची मागणी

राज्य सरकारने इंधनावरील कर कमी करण्याची भाजयमोची मागणी
Published on

राज्य सरकारकडून आकारण्यात येणारे इंधनावरील कर कमी करण्याची मागणी करत भारतीय जनता युवा मोर्चा कल्याण जिल्हा पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार जयराज देशमुख यांना भेटून निवेदन दिले.

भाजयुमो कल्याण जिल्हाध्यक्ष मिहिर देसाई, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, अजिंक्य पवार, जिल्हा सचिव चिंतन देढिया, मंडल अध्यक्ष सत्येंद्र दुबे यावेळी उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष मिहिर देसाई म्हणाले, जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत. असे असताना देशातील जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय उत्पादन शुल्कामधून पेट्रोलवर ८ रूपये आणि डिझेलवर ६ रूपये कमी केले. यामुळे केंद्र सरकारला जवळपास एक लाख कोटीपेक्षा जास्तचा भार बसणार आहे. केंद्र सरकार १९ रुपये कर आकारते आहे; तर ३० रूपये कर हा राज्य सरकार आकारते. महाराष्ट्र राज्य संपुर्ण देशामध्ये पेट्रोल, व डिझेलवर सर्वात जास्त कर आकारणारे राज्य असुन जनतेच्या हितासाठी व महागाई कमी करण्यासाठी तत्काळ हे इंधनावरील कर कमी करण्यात यावे, अशी मागणी यावेळी भाजयुमाेतर्फे करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in