भाजप नेते राजेश वानखेडे यांचा ठाकरे गटात प्रवेश; शिंदे गटाचे किणीकर यांना वानखेडे देणार आव्हान

२००७ मध्ये राजेश वानखेडे हे शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदा उल्हासनगर महापालिकेत निवडून गेले होते.
भाजप नेते राजेश वानखेडे यांचा ठाकरे गटात प्रवेश; शिंदे गटाचे किणीकर यांना वानखेडे देणार आव्हान
Published on

उल्हासनगर : अंबरनाथ विधानसभेचे आमदार बालाजी किणीकर यांच्यासमोर २०१४ मध्ये भाजपच्या तिकिटावर झुंज देणारे भाजपचे माजी सभागृह नेते राजेश वानखेडे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. बालाजी किणीकर हे शिंदे गटात असल्याने त्यांची कोंडी करण्यासाठी ही व्यूहरचना केली असल्याची चर्चा शहरात आहे.

२००७ मध्ये राजेश वानखेडे हे शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदा उल्हासनगर महापालिकेत निवडून गेले होते. तेव्हा ते भारतीय विद्यार्थी सेनेचे वरिष्ठ पदाधिकारी होते. २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांचे तिकीट कापून साई पक्षातून शिवसेनेत प्रवेश केलेले उपमहापौर विनोद ठाकूर यांना शिवसेनेने तिकीट दिले. तेव्हा राजेश वानखेडे यांनी हार न मानत निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून उतरण्याचा निर्णय घेतला. वानखेडे यांनी विनोद ठाकूर यांचा पराभव करत विनोद ठाकूर यांची राजकीय कारकीर्द संपवली. २०१७ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत राजेश वानखेडे यांनी भाजपचे तिकीट घेत सुभाष टेकडी या मागासवर्गीय बहुल प्रभागात निवडणूक लढवली. चारच्या पॅनलमध्ये त्यांनी स्वतःची जागा निवडून आणण्यात यश मिळवले. राजेश वानखेडे हे ज्येष्ठ नगरसेवक असल्याने भाजपनेही त्यांना २०२१ ते २२ या काळात सभागृह नेते हे पद देऊन त्यांचा सन्मान केला.

logo
marathi.freepressjournal.in