ठाणे, मुंबईत भाजप - शिंदे गटाची 'सावरकर गौरव यात्रा'; मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात ठाण्यात यात्रेला सुरुवात

भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडून आज राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहेत
ठाणे, मुंबईत भाजप - शिंदे गटाची 'सावरकर गौरव यात्रा'; मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात ठाण्यात यात्रेला सुरुवात
Published on

आज भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून आज राज्यभरात 'सावरकर गौरव यात्रे'चे आयोजन करण्यात आले. अशामध्ये ठाण्यात काढण्यात आलेल्या या यात्रेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील सहभाग घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतीमेचे पूजन करून यात्रेला सुरुवात केली. यावेळी रथयात्रेतही त्यांनी सहभाग घेतला होता. ठाण्यासोबतच दादर, अंधेरी, वांद्रे येथेदेखील 'सावरकर गौरव यात्रा' काढण्यात आली.

यावेळी मुख्यमतनरी एकनाथ शिंदे म्हणाले की, "स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन केला जाणार नाही," असा इशारा त्यांनी दिला. यावेळी त्यांनी गौरव यात्रेत सहभागी झालेल्या लोकांचे स्वागत केले. ते म्हणाले, "वीर सावरकरांची देशभक्ती, राष्ट्रभक्ती, प्रखर हिंदुत्ववाद ही देशवासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण त्यांचा सातत्याने अपमान केला जातो. काही लोकांकडून जाणून बुजून त्यांच्याविरोधात अपमानास्पद विधाने करतात. अशा लोकांना सडेतोड उत्तर देण्यासाठी ही यात्रा काढली. या यात्रेतूनही, 'सावरकरणाचा अपमान देशामध्ये कोणीही सहन करणार नाही,' असा संदेशच या यात्रेमधून दिसेल. याचप्रमाणे वीर सावरकरांचे विचार घराघरात पोहचावे म्हणूनही ही यात्रा भाजप आणि शिवसेनेने काढली आहे." असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

logo
marathi.freepressjournal.in