केडीएमसीच्या आगामी निवडणुकीत भाजपचा महापौर होणार

विश्वास आणि समाजकार्य पाहून केडीएसीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला जास्तीत जास्त मते मिळतील.
केडीएमसीच्या आगामी निवडणुकीत भाजपचा महापौर होणार
Published on

शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आणि डोंबिवलीकरांमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी जल्लोष केला. डोंबिवलीचे आमदार चव्हाण यांच्या कामाची ही पोचपावती म्हणावी लागेल. यापूर्वीही चव्हाण यांना राज्यमंत्री पद मिळाले होते. आपल्यातील एक डोंबिवलीकर आज कॅबिनेट मंत्री झाल्याने खऱ्या अर्थाने ठाणे जिल्ह्याचा विकास होईल असा ठाम विश्वास भाजप डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब यांनी व्यक्त केला आहे.

भाजपवर जनतेने ठेवलेला विश्वास आणि समाजकार्य पाहून केडीएसीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला जास्तीत जास्त मते मिळतील. केडीएमसीत भाजपचा महापौर बसेल आणि कल्याण-डोंबिवलीचा अधिकाधिक विकास भाजप करून दाखवील असेही मत नंदू परब यांनी म्हटले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी निमित्त 'घर घर तिरंगा' अंतर्गत देशवासियांनी १३ ते १५ ऑगस्ट या तीन दिवसात तिरंगा लावावा अशी विंनती केली. तर डोंबिवली शहरात विद्यार्थी वाहतूक बसेसची मर्यादा ठरवावी. कारण बसेसमध्ये विद्यार्थी असल्याने बसचालकाने याचे भान ठेवावे.

यासाठी डोंबिवली वाहतूक पोलीस उपशाखेत भाजपच्यावतीने पत्र देण्यात आले आहे. तरी वाहतूक पोलिसांनी डोंबिवलीतील प्रत्येक शाळेत याबाबत सूचना द्यावी अशी विंनती केल्याचे परब यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in