तीन लाख ७४ हजारांच्या शिधा वस्तूंचा काळाबाजार; शिधावाटप दुकान सील, गुन्हा दाखल

अंबरनाथच्या महालक्ष्मी नगर परिसरातील एका शिधावाटप दुकानात ३ लाख ७४ हजार रुपयांच्या शिधा वस्तूंचा काळाबाजार झाल्याचे समोर आले आहे.
तीन लाख ७४ हजारांच्या शिधा वस्तूंचा काळाबाजार; शिधावाटप दुकान सील, गुन्हा दाखल
प्रातिनिधिक फोटो
Published on

अंबरनाथ: अंबरनाथच्या महालक्ष्मी नगर परिसरातील एका शिधावाटप दुकानात ३ लाख ७४ हजार रुपयांच्या शिधा वस्तूंचा काळाबाजार झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर दुकानही सील करण्यात आले आहे.

अंबरनाथ पूर्वेकडील महालक्ष्मी नगर परिसरात असलेल्या मैत्रिणी औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित या शिधावाटप दुकानामधून ९ सप्टेंबर रोजी पहाटे काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत असलेले गणेशोत्सव रेशन किटमधील २७० लिटर तेल सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गोसावी यांनी टेम्पोसह पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी शिधावाटप अधिकाऱ्यांनी या दुकानातील ९ सप्टेंबर रोजीचा अखेरचा साठा व दुकानात उपलब्ध असलेला साठा याची पचांसमक्ष पडताळणी केली असता त्यामध्ये २८७५ किलो तांदूळ, ५४२० किलो गहू, आनंदाचा शिधा (रवा, साखर, चणाडाळ इ.) २५५ नग, आनंदाचा शिधा तेल २७० नग आदींसह ३ लाख ७४ हजार ८५२ रुपयांच्या शिधा वस्तूंचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शिधावाटप अधिकारी शशिकांत पोटसुते यांच्या फिर्यादीनुसार याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अत्यावश्यक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हे शिधावाटप दुकान सील करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in