रेशन दुकानातील तांदळाचा काळाबाजार करणारा अटकेत

चालक मोहम्मद शाईद खान ( वय - २२ वर्ष ) रा. कुर्ला, मुंबई व मूळ सागर जिल्हा मध्यप्रदेश येथील आहे
रेशन दुकानातील तांदळाचा काळाबाजार करणारा अटकेत

मिरारोड पूर्वेच्या बेव्हरली पार्क परिसरात रास्त भाव दुकानातील सरकारी गोण्यातील २ हजार ५०० किलो तांदूळ काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने पिकअप ह्या वाहनातून वाहतूक करत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रास्त भाव दुकानातील तांदळाचा काळा बाजार केल्याबाबत मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान मिरारोड पोलिसांमुळे बेव्हरली पार्क येथे एमएच -०३ ए. एच.- ९०८२ हे संशयित वाहन तपासले असता चालक मोहम्मद शाईद खान ( वय - २२ वर्ष ) रा. कुर्ला, मुंबई व मूळ सागर जिल्हा मध्यप्रदेश येथील आहे. तर त्याच्या सोबत असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीचे नाव नवलकीशोर वैष्णव (वय -३७ वर्ष) ह्यांना ताब्यात घेत, पिकअप गाडीतील ३८ सरकारी गोनीतील १९०० किलो तांदूळ ७० हजार ८१३ रुपये किमंतीचा, खाजगी ९ प्लास्टिक गोनिमधील ४५० किलो तांदूळ १६ हजार ७७१ रूपये किमतीचा व सरकारी तीन गोनिमधील १५० किलो तांदूळ ४०२६ रुपये किमतीचा आणि पिकअप वाहन हे जप्त करण्यात आले आहे.

रास्त भाव दुकानातील ९१ हजार ५१० रुपये किमतीचा सुमारे २५०० किलो तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत असताना पकडल्याने रेशन दुकानातील काळा धंदा पुन्हा एकदा उजेडात आला आहे. काळाबाजार करणाऱ्या आरोपींच्या विरोधात जीवनाश्यक वस्तु कायदा १९५५ चे कलम ३, ७ व ८ सह राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ च्या तरतूदीच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अधिक तपास सहायक पोलिस आयुक्त विलास सानप व वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मिरारोड पोलीस हे करत आहेत.

गोरगरिबांना रेशन मिळावे म्हणून सरकारकडून विविध योजना राबवून जनतेपर्यंत आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या नागरिकांना शासनाकडून सवलतीच्या दरात धान्याचे वितरण करण्यात येते. विविध घटकांतील लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात येते. त्यानुसार लाभार्थ्यांना धान्य उपलब्ध करुन देण्यात येते. यात गहू, तांदूळ, डाळ, साखरेचाही समावेश असतो. मात्र या धान्याची विक्री काळ्यात बाजारात होत असल्याची बाब अनेकदा ह्यापूर्वीही उजेडात आलेल्या आहेत. पात्र लाभार्थ्यांच्या धान्यावर रेशन माफियेच डल्ला मारतात.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in