पत्रकार दिनानिमित्त ठाण्यात रक्तदान शिबीर

ठामपा मुख्यालयात रक्तदान शिबिराचा प्रारंभ ठामपा आयुक्त अभिजीत बांगर आणि पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे या मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.
पत्रकार दिनानिमित्त ठाण्यात रक्तदान शिबीर

ठाणे : आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दर्पण' या वृत्तपत्राची सुरुवात दि. ६ जानेवारी रोजी केल्याने हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. या पत्रकार दिनाचे औचित्य साधून ठाणे महापालिका, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकाराने शुक्रवार, दि. ५ जानेवारी रोजी ठाणे महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात पत्रकार बांधव तसेच ठामपा कर्मचारी व नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. सध्या राज्यात रक्तसाठ्याची कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक जबाबदारी म्हणून ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाने पत्रकार दिनाचे औचित्य साधून ठाणे मनपा आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकाराने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.

ठामपा मुख्यालयात रक्तदान शिबिराचा प्रारंभ ठामपा आयुक्त अभिजीत बांगर आणि पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे या मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. याप्रसंगी,ठामपा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, संदीप माळवी, कळवा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे आदीसह पत्रकार बांधव उपस्थित होते. दुपारी ३ वाजेपर्यत तब्बल ५० पिशव्या रक्त संकलन झाल्याची माहिती आयोजकांनी दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in