वारांगडे ग्रामस्थांना मृत्यूनंतरही यातना: खडकावर जाळावे लागतात प्रेतं; रहिवाशांच स्मशानभूमीसाठी संघर्ष

वारांगडे येथे सुवर्णा सुमडा आणि राजू भावर याची आदिवासी मालकी जागा आहे. मात्र येथे एका जमीनदारांनी अनधिकृत खदाण खोदण्यात आली आहे
वारांगडे ग्रामस्थांना मृत्यूनंतरही यातना: खडकावर जाळावे लागतात प्रेतं; रहिवाशांच स्मशानभूमीसाठी संघर्ष

पालघर : मान ग्रामपंचायतमधील वारांगडे येथील डोंगरीपाडा येथील आदिवासी पाड्याचे रहिवाशी स्मशानभूमी अभावी खडकावर प्रेत जाळत असल्याने येथील रहिवाशांना मृत्यूनंतरही यातना सोसाव्या लागत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. मान वरंगडे येथे ग्रामपंचायत कडून स्मशान भूमी बांधून मिळावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. येथील स्थानिक रहिवाशांनी मान ग्रामपंचायत, पालघर तहसीलदार यांच्याकडेही वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आदिवासींना कोणी वाली नसल्याचे म्हणणे येथील स्थानिक रहिवाशी सुनील भावर यांनी बोलताना सांगितले. याबाबत ग्रामपंचायतीची बाजू समजून घेण्यासाठी संपर्क केला; मात्र संपर्क न झाल्याने माहिती मिळू शकली नाही.

वारांगडे येथे सुवर्णा सुमडा आणि राजू भावर याची आदिवासी मालकी जागा आहे. मात्र येथे एका जमीनदारांनी अनधिकृत खदाण खोदण्यात आली आहे. त्यामुळे खदाण चालक यांनी गावाला वेठीस धरले आहे. अनेक वर्षांपासून डोंगरी पाड्याच्या स्मशानभूमीला लागून ही खदाण असल्याने खदाणचालक येथे स्मशानभूमी होऊ देत नाही. परिणामी ग्रामस्थ स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत, पंचायत समितीकडे वारंवार अर्ज विनंत्या करूनही या पाड्याला स्मशानभूमी नाही. परिणामी स्मशानभूमीअभावी ग्रामस्थांना खडकावर सरण रचून प्रेत जाळावे लागत आहेत. पावसाळ्यात मात्र स्मशानभूमी अभावी प्रचंड हाल होतात. त्यामुळे या पाड्यात स्मशानभूमी होण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

वारंगडे येथे खदाणमध्ये सुरुंग स्फोट केले जात असल्याने येथील आजूबाजूच्या घरांच्या भिंतीना तडे गेले आहेत. तर काही भागात बोरवेलचे पाण्याचे स्रोत नष्ट झाले आहेत. आणि पाड्याला स्मशानभूमी होऊ देत नाही. त्यामुळे रहिवाशांची गैरसोय होत आहे.त्यामुळे आम्ही वरांगडे ग्रामस्थांनी अन्यायाविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

- सुनील भावर, स्थानिक रहिवासी

logo
marathi.freepressjournal.in