डाईंग कारखान्यात बॉयलरचा स्फोट

आगीचे कारण स्पष्ट झाले नसून, भोईवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी या घटनेची चौकशी करीत आहेत
डाईंग कारखान्यात बॉयलरचा स्फोट

भिवंडी : भिवंडीत डाईंग कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाला. शहरातील देवजीनगर नारपोली परिसरात असलेल्या सोलंकी प्रोसेस मिल या कपड्यावर प्रक्रिया करणाऱ्या डाईंगमध्ये शुक्रवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास बॉयलरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत एक कामगार जखमी झाला आहे. हे स्फोट झाल्यानंतर एक किलोमीटरच्या परिसरातील इमारतीला हादरे बसले. या आगीची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे कारण स्पष्ट झाले नसून, भोईवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी या घटनेची चौकशी करीत आहेत. दरम्यान, या दुर्घटनेत लालचंद यादव हा कामगार भाजल्याने जखमी झाला असून, त्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

logo
marathi.freepressjournal.in