
गेली दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सणउत्सव निर्बंधात साजरे करावे लागले. पण यंदाच्या वर्षी निर्बंध मुक्त झाल्याने सर्वच धर्मीय सणउत्सव हे मोठ्या उत्साहाने साजरे करत आहेत. पुढच्या महिन्यात सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे. कारण दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंधात गणेशोत्सव साजरा करावा लागला होता. गणपतीच्या आगमनाच वातावरण श्रीगणेशाच्या नगरित म्हणजेच पेणमध्ये वर्षांचे बाराही महीने असते. सध्या गणेशोस्तवासाठी लागणाऱ्या मुर्त्यांचे काम हे अंतिम टप्प्यात आले आहे. पण यंदा महागाईचा फटका हा मुर्त्यांवर बसला असून १० टक्के वाढ ही मुर्त्यांच्या किंमतीत झालेली दिसत आहे.
गेली दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंधात गणेशोत्सव साजरा केला गेला. पण यंदा निर्बंध मुक्त झाल्याने शहरात गणेशोत्सव मंडळ तसेच नागरिक गणेशोत्सवाच्या तयारीला लागले आहे. गणेशोत्सवासाठी बाप्पाच्या मूर्तीचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे. दोन वर्ष ५० टक्क्यांपेक्षा कमी मूर्ती विकल्या गेल्याने आर्थिक संकटात असलेल्या मुर्तीकारांना यंदा मात्र अच्छे दिन येणार असल्याचे चित्र दिसत आहे.
महागाईचा मूर्ती विक्रीवर
देखील फटका
वाढत्या महागाईमुळे मूर्तीसाठी लागणारे साहित्य देखील महाग झाल्याने यंदा मुर्त्यांच्या किंमतीमध्ये दहा टक्के एवढी वाढ झाली आहे. तसेच रंग, ब्रश, प्लास्टर आणि कामगारांच्या वेतनात झालेल्या वाढीमुळे हरतालिकेचेही दर वाढल्याचे येथील मूर्तिकार संदीप गुरव यांनी नवशक्तिला सांगितले.