कोरोनाच्या विजनवासानंतर गोपाळकालाची धूम; शेकडो दहीकाला मंडळांचा उत्साह पुन्हा शिगेला

गेल्या दोन वर्षात विश्वावर आलेले कोरोनाचे महासंकट त्यामुळे नेहमीच्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा होऊ शकला नव्हता
कोरोनाच्या विजनवासानंतर गोपाळकालाची धूम; शेकडो दहीकाला मंडळांचा उत्साह पुन्हा शिगेला

ठाणे शहराला दहीहंडीची पंढरी म्हणून ओळखले जाते, या शहरात अवघ्या काही वर्षात नावारूपाला आलेली दहीहंडी जितेंद्र आव्हाड यांनी सातासमुद्रापार पोहोचवली, या पारंपरिक सणाला आधुनिक झालर लावत दहीहंडी ग्लोबल झाली, सुरवातीला पाच-सहा थरापर्यंत लावली जाणारी हंडी बक्षिसाच्या लाखमोलाच्या रकमा जिंकण्यासाठी नऊ थरापर्यंत गगनाला भिडू लागली, गेल्या काही वर्षांपासून विश्व् विक्रमी दहा थर लावण्याचा सराव मुंबई ठाण्यातील काही मंडळांनी सुरु केलेला होता; त्यामुळे हा विश्व् विक्रम कोणत्याही क्षणी नोंदवला जाऊ शकतो, असे वातावरण असताना दोन वर्षांपूर्वी कोल्हापूर सांगलीत आलेला महापूर आणि त्यानंतर गेल्या दोन वर्षात विश्वावर आलेले कोरोनाचे महासंकट त्यामुळे नेहमीच्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा होऊ शकला नव्हता. मात्र यंदा नव्या उत्साहात गोपाळकाला साजरा होणार असून गेले काही वर्षे करोडोची आर्थिक उलाढाल ठप्प झाली होती, ती आता पुन्हा होणार असल्याने व्यापारी सुखावले आहेत तर दहीकाला मंडळांचा उत्साह पुन्हा शिगेला पोहोचला आहे.

शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी टेम्भी नाक्यावर मानाची हंडी सुरु केली तर, त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओपन हाऊस येथे दहीहंडी उत्सव सुरु करून हा सण जागतिक पातळीवर नेला, कधी काळी सकाळी खेळला जाणारा हा उत्सव ग्लोबल झाल्यामुळे रात्री उशिरापर्यंत साजरा होऊ लागला. २४ तास चालणाऱ्या टीव्ही चॅन्सलनी या खेळाला महत्वाचे स्थान दिल्याने या खेळाची लोकप्रियता चांगलीच वाढली , त्यामुळे गल्ली बोळातील नेत्यांनींही लोकप्रियता मिळवण्यासाठी आपल्या आपल्या विभागात दहिहंडी उत्सव सुरु केले. सुरुवातीला हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या दही हंडी लावल्या जात होत्या, मात्र गेल्या काही वर्षात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टेम्भी नाक्यावरील शिवसेनेची मानाची हंडी, जितेन्द्र आव्हाड यांची ओपन हाऊसची हंडी या लोकप्रिय हंड्या सोबत जांभळी नाक्यावर राजन विचारे, वर्तकनगरला संस्कृती प्रतिष्ठाणचे आमदार प्रताप सरनाईक, नौपाडा येथे मनसेचे अविनाश जाधव, वसंत विहार सर्कल येथे भाजपचे शिवाजी पाटील, बाळकुमला शिवसेनेचे देवराम भोईर अशा विविध नेत्यांनी आपल्या आपल्या विभागात दहीहंडी उत्सव सुरु केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in