पतंग पकडायला गेला, जीव गमावून बसला; इमारतीवरून खाली पडून लहानग्याचा मृत्यू

पतंग पकडण्याच्या नादात त्याचा तोल गेला व अखेरकार पतंग पकडणे त्याच्या जीवावर बेतले आहे.
पतंग पकडायला गेला, जीव गमावून बसला; इमारतीवरून खाली पडून लहानग्याचा मृत्यू
(पतंग उडवितानाचे प्रातिनिधिक छायाचित्र)

भाईंंदर : मीरारोड पूर्वेच्या पूजा नगर परिसरात मंगळवारी गच्चीवर पतंग पकडण्यासाठी इमारतीच्या गच्चीवर गेलेल्या ११ वर्षीय मुलाचा तोल गेल्याने इमारतीवरून खाली पडल्याने मृत्यू झाला आहे. मृत्यूपूर्वी काही तास आधी सीसीटीव्हीमध्ये तो चिमुकला सोसायटीच्या मुलांसोबत सायकल चालवत असल्याचे निदर्शनास आले होते.

हमजा मुस्ताक कुरेशी असे मयत मुलाचे नाव असून पूजा नगरमधील सरयू अपार्टमेंट मधील सी-विंगमधील मुस्ताक कुरेशी आपल्या पालकांबरोबर राहत होता. मंगळवारी सायंकाळी तो इमारतीच्या गच्चीवर खेळायला गेला असताना तोल जाऊन खाली पडला. यावेळी त्याला उपचारासाठी मीरारोडच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र डोक्याला जबर मार लागल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. मयत चिमुकला हमजा हा इमारतीचे टेरेस नेहमी बंद असायचे मात्र सोसायटीमध्ये रिपेअरिंग काम सुरू असल्याने बी-विंगचे टेरेस उघडे होते. हा पतंगकरिता नेहमी त्या विंगमधून टेरेसवर जात होता मात्र कामगारांकडून त्याला नेहमी वर येण्यापासून अडवले जात होते. दररोज पतंग पकडून घरात जमा करून ठेवण्याचा त्याला छंद जडला होता.

मंगळवारी कामगारांचे लक्ष नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर हमजा नकळत टेरेसवर गेला. पतंग पकडण्याच्या नादात त्याचा तोल गेला व अखेरकार पतंग पकडणे त्याच्या जीवावर बेतले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in