मेंढवण येथील महामार्गावर गंधक पेटले

आग पूर्णपणे विझवण्यासाठी १ तास १५ मिनिटे लागली. अग्निशमन दलाने ही विझविण्यासाठी एक लेन पूर्णत: बंद केली होती
मेंढवण येथील महामार्गावर गंधक पेटले

पालघर : मुंबई-अहमदाबाद हायवेवरील मेंढवणजवळ टँकर अपघातात सांडलेल्या गंधकाने शनिवारी मध्यरात्री १ च्या सुमारास अचानक पेट घेतला. ही आग अदानी डहाणू थर्मल पॉवर स्टेशन अग्निशमन दलाने आटोक्यात आणली. दरम्यान संपूर्ण महामार्गावर आगीची झळ बसत असल्यामुळे वाहतूककोंडी झाली होती. तर आगीमुळे वाहतुकीला धोका निर्माण झाला होता. मात्र रविवारी उशिराने आग आटोक्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

मुंबई-अहमदाबाद हायवेवर मेंढवनजवळ हायवेच्या कडेला असलेल्या गंधकाच्या गळतीमुळे पहाटे १ च्या सुमारास आग लागली. तत्काळ अदाणी डहाणू थर्मल पॉवर स्टेशन अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. काही दिवसांपूर्वी सल्फर वाहून नेणारा टँकर त्या ठिकाणी कोसळला होता. सल्फरची गळती झाली होती. दरम्यान सांडलेले गंधक संकलित न केल्याने रस्त्याच्या कडेला पसरले होते. सल्फर न उचलता हायवे रोडच्या बाजूला टाकण्यात आले होते. आग पूर्णपणे विझवण्यासाठी १ तास १५ मिनिटे लागली. अग्निशमन दलाने ही विझविण्यासाठी एक लेन पूर्णत: बंद केली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in