पीओपीच्या किल्ल्यांवर मावळे मात्र मातीचे!

शाळेला दिवाळीची सुट्टी लागताच मुलांची किल्ले बनवण्याची लगबग सुरू होते. माती,दगड, गोळा करायला घोळक्याने निघतात.
पीओपीच्या किल्ल्यांवर मावळे मात्र मातीचे!
Published on

वाढत्या शहरीकरणामुळे आता माती मिळणे अडचणीचे झाले आहे. त्यातच सर्वत्र आता टोलेजंग इमारती उभ्या राहिल्याने किल्ला कुठे उभारायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे? अशावेळी वेळेअभावी कमी जागेत किल्ले उभारण्यासाठी पीओपीचे किल्ले हा एक पर्याय उपलब्ध झाल्याने या बाजारात त्यांची मागणी वाढत आहे. मात्र या पीओपीच्या किल्ल्यांवर मावळे मात्र मातीचे असल्याचे पहायला मिळत आहे.

शाळेला दिवाळीची सुट्टी लागताच मुलांची किल्ले बनवण्याची लगबग सुरू होते. माती,दगड, गोळा करायला घोळक्याने निघतात. किल्ला तयार करताना मातीचे लिंपण करणे हे सर्व कामे ते स्वतः करतात. मात्र आता हे चित्र क्वचितच पहायला मिळत आहे. आताच्या मुलांना एक वेळ मिळत नाही, त्यातच जागेचा आभाव आणि विशेष म्हणजे बरीच मुले स्मार्ट फोनच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे कमी वेळात आणि कमी जागेत बसत असल्याने पीओपीच्या किल्ल्यांना मागणी वाढली आहे.

हे किल्ले लहान मोठे आकाराचे असून याची किमत ५०० पासून सुरू होऊन ८०० पर्यंत आहे. किल्ल्यांसाठी असलेले मावळे मात्र मातीचे आहेत. विविध प्रकारचे मावळे याठिकाणी उपलब्ध आहे. मातीचे मावळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजरीत्या घेऊन जाऊ शकतो.

logo
marathi.freepressjournal.in