Bhiwandi : अनधिकृत शाळा चालवणाऱ्यांविरोधात गुन्हा; पाच शाळांच्या मुख्याध्यापक-व्यवस्थापकांवर कारवाई

भिवंडी शहरात अनधिकृतपणे सुरू असलेल्या शाळा बंद करण्याचे आदेश देऊनही त्या सुरूच ठेवल्याप्रकरणी पाच शाळांचे मुख्याध्यापक आणि संस्था व्यवस्थापकांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Bhiwandi : अनधिकृत शाळा चालवणाऱ्यांविरोधात गुन्हा; पाच शाळांच्या मुख्याध्यापक-व्यवस्थापकांवर कारवाई
Bhiwandi : अनधिकृत शाळा चालवणाऱ्यांविरोधात गुन्हा; पाच शाळांच्या मुख्याध्यापक-व्यवस्थापकांवर कारवाई
Published on

भिवंडी : भिवंडी शहरात अनधिकृतपणे सुरू असलेल्या शाळा बंद करण्याचे आदेश देऊनही त्या सुरूच ठेवल्याप्रकरणी पाच शाळांचे मुख्याध्यापक आणि संस्था व्यवस्थापकांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अनधिकृत शाळा चालवणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून शहरातील अनधिकृत शाळांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ज्या शाळांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये झवेरिया उर्दू प्राथमिक शाळा (गैबीनगर, भिवंडी), कैसर बेगम इंग्रजी शाळा (नागाव, भिवंडी), व्हिक्टोरिया इंग्रजी प्राथमिक शाळा (सुभाषनगर, अजदिया रोड, भिवंडी), इस्लामिया इंग्लिश स्कूल (फातमानगर, भिवंडी) आणि मोहम्मद मुरसलीम (एम.एम.) पब्लिक इंग्रजी प्राथमिक शाळा (कल्याण रोड, भिवंडी) यांचा समावेश आहे.

महापालिकेच्या शिक्षण विभागाने या अनधिकृत शाळांना ८ मे २०२४ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत शाळा बंद करण्याचे लेखी आदेश टपालाद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून बजावले होते. मात्र, या आदेशांकडे दुर्लक्ष करून संबंधित शाळा सुरूच ठेवल्याचे महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले.

शिक्षण विभागाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी सौदागर अनिरुद्ध शिखरे यांच्या फिर्यादीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम २२३ अन्वये पाचही शाळांचे मुख्याध्यापक व संस्था व्यवस्थापकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in