कर्नाटकातील व्यापाऱ्याचे चोरीस गेलेले ९२ लाखांचे काजू जप्त

कर्नाटकातील एका काजू उत्पादक कंपनीचे १ कोटी २१ लाख ७६ हजार रुपये किमतीचे काजू गुजरातला न पोहचवता त्याची परस्पर विक्री करण्यात आली होती.
कर्नाटकातील व्यापाऱ्याचे चोरीस गेलेले ९२ लाखांचे काजू जप्त

भाईंंदर : कर्नाटकातील एका काजू उत्पादक कंपनीचे १ कोटी २१ लाख ७६ हजार रुपये किमतीचे काजू गुजरातला न पोहचवता त्याची परस्पर विक्री करण्यात आली होती. या प्रकरणी मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने विरार व वाशी येथून ९२ लाख ७० हजारांचे काजू हस्तगत करत दोघांना कर्नाटक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

कर्नाटकच्या उडपी-शिरूर भागात मोहनदास विठ्ठल शेट्टी यांची श्रीकृष्ण नांवाने काजू कारखाना आहे. गुजरातच्या सुरत व अहमदाबाद भागातील काजूची ऑर्डर असल्याने त्यांच्या कारखान्यातून १ कोटी २१ लाख ७६ हजार रुपये किमतीचे २४.६३ मेट्रीक टन काजू २ हजार ४६९ बॉक्समध्ये भरून ट्रक क्र. जी.जे.२७-टीएफ-०६१६ मधून पाठविण्यात आला होता. परंतु काजूची ऑर्डर सुरत व अहमदाबाद येथील व्यापाऱ्यांना पोहचलीच नसल्याने कर्नाटक येथील ब्रह्मावर पोलीस ठाण्यात ट्रकचामालक, चालक व क्लिनर अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, गुजरात येथून ट्रकच्या क्लिनरला ताब्यात घेण्यात आले. तर सदर माल विकणारा मध्यस्थी महेंद्रपुरी लालपुरी गोसावीला अटक करण्यात आली होती. गोसावी हा मीरारोडचा राहणार असून त्याने ट्रकचालक, मालक व क्लिनर यांच्याशी संगनमत करून काजूचा अपहार करून तो अन्यत्र व्यापाऱ्यांना विकल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले.

logo
marathi.freepressjournal.in