रेयांश प्रतिष्ठानतर्फे कामण येथे सीसीटीव्ही कॅमेरे

या सीसीटीव्ही कॅमेराचे लोकार्पण नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांच्या हस्ते करण्यात आले.
रेयांश प्रतिष्ठानतर्फे कामण येथे सीसीटीव्ही कॅमेरे

वसई : संपूर्ण देशात रामललाच्या प्राणप्रतिष्ठपनेचे औचित्य अनेक सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच निमित्ताने कामण येथील रेयांश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नवित भोईर यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून दोन हाय व्हिजन सिसीटीव्ही कॅमेऱ्याची भेट नायगाव पोलीस स्टेशनला केली असून, या सीसीटीव्ही कॅमेराचे लोकार्पण नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांच्या हस्ते करण्यात आले. कामण-भिवंडी मार्गावर डोंगरी पाडा नाका येथे सुरक्षिततेच्या दृष्टीने हे कॅमेरे लावण्यात आले. यावेळी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कदम, आवारे, पोलीस हवालदार बोडके, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजू म्हात्रे, पोमन गावचे सरपंच आत्माराम ठाकरे, उपसरपंच रत्ना देवळीकर, समाज कल्याण न्यासचे अध्यक्ष प्रकाश देवळीकर, सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी तथा पोमन परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in