पोलीस निरीक्षकांच्या दालनाबाहेरचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर, आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनात शिवसेना पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबाराचा सीसीटीव्ही फुटेज बाहेर आल्यानंतर आता दालनाबाहेरचा दुसरा सीसीटीव्ही फुटेज ही व्हायरल झाला आहे.
पोलीस निरीक्षकांच्या दालनाबाहेरचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर, आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण

उल्हासनगर : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनात शिवसेना पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबाराचा सीसीटीव्ही फुटेज बाहेर आल्यानंतर आता दालनाबाहेरचा दुसरा सीसीटीव्ही फुटेज ही व्हायरल झाला आहे. या फुटेजमध्ये आ. गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड आणि त्यांचे समर्थक हे हुज्जत घालत असल्याने पोलीस त्यांना शांत करून पोलीस ठाण्याबाहेर घालवण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री १० वाजून ४० मिनिटांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण पूर्वचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड, तालुकाप्रमुख राहुल पाटील आणि नेवाळी ग्रामपंचायत येथे माजी सरपंच चैनु जाधव यांच्या दिशेने गोळीबार केल्याचे फुटेज समोर आले. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारेच आमदार गणपत गायकवाड, वैभव गायकवाड, हर्षल केने, संदीप सरवणकर आदी जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तीन जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना अकरा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेमार्फत केला जात आहे.

त्यानंतर नव्याने पोलीस निरीक्षकांच्या दालनाबाहेरचा सीसीटीव्ही समोर आला आहे. या फुटेजमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या केबिन बाहेर आमदार सुपुत्र वैभव गायकवाड आणि त्यांचे कार्यकर्ते हे शिवसेना माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या समर्थकांमध्ये गोंधळ झाल्याची दृष्य सीसीटीव्ही चित्रित झाली आहेत. या गोंधळानंतरच आमदार गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये गोळीबार केला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in