ठाण्यात सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ; ४ लाखांचा ऐवज लुटला

ठाण्यात सोनसाखळीच्या दोन घटना उघड झाल्या आहेत. या घटनांत मिळून सुमारे ४ लाख १० हजार रुपयांच्या दागिन्यांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
ठाण्यात सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ; ४ लाखांचा ऐवज लुटला
ठाण्यात सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ; ४ लाखांचा ऐवज लुटला'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

ठाणे : ठाण्यात सोनसाखळीच्या दोन घटना उघड झाल्या आहेत. या घटनांत मिळून सुमारे ४ लाख १० हजार रुपयांच्या दागिन्यांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.

कापूरबावडी परिसरात शोभा उर्फ सविता राजेंद्र पाटील रविवारी रात्री मुलासोबत दुचाकीवरून वर्तकनगरकडे जात होत्या. रुस्तमजी बिल्डिंगसमोर दोन इसम मोटारसायकलवरून त्यांच्या दुचाकीजवळ आले. त्यांनी गाडी अडवून पाटील यांच्या गळ्यावर हात मारत सोन्याची चेन आणि मंगळसूत्र जबरदस्तीने खेचून पळ काढला. या घटनेत सुमारे १.२० लाख रुपयांच्या दागिन्यांचा तुटलेला भाग चोरट्यांनी लंपास केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दुसऱ्या घटनेत घोडबंदर रोडवरील गायमुख परिसरात घडली. बोरिवली येथील गायत्री कृष्णा सेल्वराज या कुटुंबासह शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन करून कारने मुंबईकडे परतत होत्या. १५ मार्च रोजी पहाटे गायमुख बसस्टॉपजवळील हनुमान मंदिराजवळ त्यांची कार थांबली असताना मुलीला उलटी होत असल्याने कारची काच खाली करण्यात आली होती.

याचवेळी पायी चालत आलेल्या एका अनोळखी इसमाने कारजवळ येऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि चेन जबरदस्तीने खेचून जवळील जंगलाच्या दिशेने पळ काढला. या घटनेत सुमारे २ लाख रुपयांचे मंगळसूत्र आणि ९० हजार रुपयांची चेन, असा २.९० लाख रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. या दोन्ही घटनां प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in