उल्हासनगर महापालिकेच्या पतपेढीच्या निवडणुकीत परिवर्तन

उल्हासनगर महापालिकेच्या पतपेढीच्या निवडणुकीत परिवर्तन

उल्हासनगर महापालिकेच्या पतपेढीच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलचे १३ पैकी ९ उमेदवार निवडून आले आहेत. त्यापैकी महिला वर्गासाठी आरक्षित जागेसाठी समसमान मते पडल्याने नशिबाच्या चिठ्ठीने आशा कजानिया यांच्या बाजूने कौल दिला आहे.

आयटीआय शाळेमध्ये ही निवडणूक पार पडली. यावेळी १३९२ मतदारांपैकी १२४७ पेक्षा अधिक मतदारांनी मतदानात भाग घेतला. रात्री उशिरापर्यंत झालेल्या मतमोजणीत सर्वसाधारण जागेसाठी झालेल्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे विनोद केणे, अच्युत सासे, दीपक भोये, ब्रह्मचंद करोतिया, नरेश परमार, संदीप बिडलान, अनिल राठी हे विजयी झाले आहेत. भटक्या विमुक्त जाती/विशेष मागास प्रवर्ण मतदार जागेवरून एकनाथ पवार, महिला राखीव जागेवर आशा कजानिया विजयी झाल्या आहेत. तर महिला राखीव मधून सिद्धांत पॅनेलच्या जयश्री साठे आणि सर्वसाधारण जागेवर मनोज जाधव हे निवडून आले आहेत. कामगार एकता पॅनलचे दीपक दाभने हे इतर मागासवर्गीय जागेवरून तर विजय बेहनवाल हे मागासवर्गीय जागेवरून निवडून आले आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in