आव्हाडांचे अर्धनग्न चित्र प्रसारित करणाऱ्यावर आरोपपत्र दाखल

अनंत करमुसे याने डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचे अर्धनग्न अवस्थेतील माॅर्फ केलेले छायाचित्र त्याने समाजमाध्यमांवर प्रसारीत केले होते
आव्हाडांचे अर्धनग्न चित्र प्रसारित करणाऱ्यावर आरोपपत्र दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आमदार डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचे अर्धनग्न छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारीत करणाऱ्या अनंत करमुसे याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात करमुसे याने तपासकामात कोणत्याही प्रकारचे साह्य केले नसल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला असून त्याने दाखल केलेली याचिकाही स्वच्छ हेतूने केली नसल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले आहे. करमुसे याचे ट्वीट आणि फेसबुक पोस्ट हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेबाहेर असल्याचेही न्यायालयाने नमूद केले आहे.

अनंत करमुसे याने डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचे अर्धनग्न अवस्थेतील माॅर्फ केलेले छायाचित्र त्याने समाजमाध्यमांवर प्रसारीत केले होते. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी ६ एप्रिल २०२० रोजी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील दोषारोपपत्र ठाणे न्यायालयात दाखल करण्यात आहे. या आरोपपत्रामध्ये पोलिसांनी करमुसे याच्या वर्तणुकीवर ताशेरे ओढले आहेत. पाच वर्षे अनंत करमुसे हा डाॅ. जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करीत असून त्याला या कामी अन्य कोण साह्य करीत आहे का? याचा शोध घेण्यासाठी अनंत करमुसे यास सुमारे ५ वेळा समजपत्र पाठवूनही त्याने पोलिसांना सहकार्य केले नसल्याचेही या दोषारोपपत्रात पोलिसांनी नमूद केले आहे.

आव्हाड यांना ठार मारण्याचा कट

अनंत करमुसे हा ज्या संघटनेचा ठाणे अध्यक्ष म्हणून कार्यरत होता. त्याच संघटनेचा सदस्य अविनाश पवार याने डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या घराची रेकी केली होती. तसेच त्याच संघटनेचा सदस्य असलेल्या शाश्वत नावाच्या एका इसमाने आपल्या ट्वीटर हँडलरवरून डाॅ.जितेंद्र आव्हाड यांना "काही मंडळी तुमची वाट पहात आहे. बाहेर निघू नका" अशी धमकी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात डाॅ. आव्हाड यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचे स्पष्ट झाल्याने अविनाश पवार याला अटक करण्यात आली असून सध्या तो ऑर्थर रोड कारागृहात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in