Chhagan Bhujabal : ठाण्यात मंत्री भुजबळांविरोधात शरद पवार गट आक्रमक ; पुतळा जाळत केलं आंदोलन

कार्यकर्त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांचा गद्दार असा उल्लेख करत मोठ्या घोषणा बाजी केली. तसंच त्यांचा पुतळ्याला जोडे मारुन त्यांनी केलेल्या टीकेचा निषेध करण्यात आला
Chhagan Bhujabal : ठाण्यात मंत्री भुजबळांविरोधात शरद पवार गट आक्रमक ; पुतळा जाळत केलं आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या(NCP) अजित पवार(Ajit Pawar) गटाची काल बीड(Beed) येथे सभा पार पडली. या सभेत अजित पवार गटातील मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्यावर केलेल्या टीकेचे पडसाद सोमवारी ठाण्यात उटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत घोषणाबाजी केली. यावेळी भुजबळांचा पुतळा देखील जाळण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि महिलाध्यक्षा सुजाता घाग यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं.

यावेळी उपस्थिती कार्यकर्त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांचा गद्दार असा उल्लेख करत मोठ्या घोषणा बाजी केली. तसंच त्यांचा पुतळ्याला जोडे मारुन त्यांनी केलेल्या टीकेचा निषेध करण्यात आला. यानंतर भुजबळांचा पुतळा जाळण्यात आला. काल बीड येथे पार पडलेल्या सभेत अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्या टीका केली होती. यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले होती की, "साहेब म्हणतात.. माझी चुक झाली, माफी मागतो. तुम्ही कोणाकोणाची माफी मागणार, सगळ्यांनी सह्या केल्या आहेत. तुम्हाला जर माफी मागायची असेल तर ५४ ठिकाणी माफी मागावी लागेल ", अशी टिका भुजबळ यांनी पवारांवर केली होती. त्याचे पडसाद आज ठाण्यात उमटताना दिसले.

छगन भुजबळ यांच्यावर शरद पवार यांनी प्रचंड प्रेम केलं. तुरुंगातून आल्यानंतर देखील पवारांनी त्यांना मंत्रीपद दिलं. शरद पवारांकडून सर्व मिळवून मोठे झाल्यानंतर भुजबळ हे गद्दारी करीत असतील. तर आम्ही ते सहन करणार नाही. आमच्या दैवताचे फोटो वापरतात आणि आमच्याच दैवाताचा अपमान करणार असाल तर ते आम्ही सहन करणार नाही. त्यांच्या या कृतीला आम्ही उत्तर देऊच, असा इशारा जिल्हाध्यक्ष देसाई यांनी दिलं.

logo
marathi.freepressjournal.in