छोटा राजनच्या शूटरला मुंब्य्रातून अटक

या हत्येत आरोपी बिलाल सय्यद मुस्तफा सय्यद यांच्यासह अन्य आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली
छोटा राजनच्या शूटरला मुंब्य्रातून अटक

हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या बिलाल सय्यद मुस्तफा याने पॅरॉलवर सुटून पोबारा केला होता. आरोपी बिलाल हा मुंब्रा परिसरात असल्याच्या माहितीवरून मालमत्ता शोध पथकाने त्याला अटक करून मुंब्रा पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले.

छोटा राजनच्या आदेशावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांचा भाऊ इकबाल कासकर याचा बॉडीगार्ड बिलाल सय्यद मुस्तफा सय्यद याची हत्या नागपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत केली होती. या हत्येत आरोपी बिलाल सय्यद मुस्तफा सय्यद यांच्यासह अन्य आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. नागपूर कारागृहात शिक्षा भोगत असताना बिलाल याने पॅरॉलवर सुटून पोबारा केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर पोलीस पथकाने फरारी आरोपी बिलाल सय्यद मुस्तफा सय्यद याला मुंब्य्रातून अटक केली. आरोपी बिलाल याला मुंब्रा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

आदेशावरून केली होती हत्या

दाऊद कासकर याचा भाऊ इकबाल कासकर चा बॉडीगार्ड आरिफ बैल यास जीवे ठार मारण्याचे फर्मान काढले होते. त्याप्रमाणे छोटा राजन चा विश्वासू सहकारी रवी मल्लेश बोरा उर्फ डिके राव व इतर सात लोकांनी आरिफ बैल यास नागपाडा हद्दीत गोळीबार करून ठार मारले होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in