तालुक्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमाला वेग; या उपक्रमाचा केंद्रस्तरीय समितीकडून आढावा

या उपक्रमाला सोमवारपासून केंद्रस्तरीय समितीकडून आढावा घेतला जाणार आहे. प्रत्येक केंद्रस्तरीय दोन तालुकास्तरावर तीन शाळांची निवड करण्यात येणार आहे.
तालुक्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमाला वेग; या उपक्रमाचा केंद्रस्तरीय समितीकडून आढावा

जव्हार : जव्हारसारख्या ग्रामीण आणि आदिवासी बहुल भागात शिक्षणाचे काम अविरत चालू असून, शासनाच्या अनेक विविध योजनेतून येथील विद्यार्थ्यांची प्रगती साधली जात आहे, यात भरीव योगदान म्हणून राज्य भरात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रम राबविला जात आहे. यात जिल्हा परिषद शाळा २२७, नगर परिषद शाळा ४, उर्दू माध्यम १, इतर व्यवस्थापन २३, इंग्रजी माध्यम ३, शासकीय आश्रम ११ अशा तालुक्यातील एकूण शाळा सहभागी झाल्या आहेत.

या उपक्रमाला सोमवारपासून केंद्रस्तरीय समितीकडून आढावा घेतला जाणार आहे. प्रत्येक केंद्रस्तरीय दोन तालुकास्तरावर तीन शाळांची निवड करण्यात येणार आहे. प्रथम तीन द्वितीय दोन व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या शळेस एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार असल्याचे तालुका शिक्षण विभाग कार्यालयातून सांगण्यात आले आहे.

तालुकास्तरावरील निवड समितीचे गटविकास अधिकारी अध्यक्ष, शिक्षण विस्तार अधिकारी सचिव, तर नगर परिषदेचे मुख्याधिकारी सदस्य असतील, जिल्हास्तरावर तीन शाळेची निवड केली जाणार आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी राज्य सरकारकडून ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. शाळांनाही प्रोत्साहन मिळावे म्हणून पारितोषिक, प्रशस्तीपत्र, मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. शाळेसह परिसराचे सौंदर्यीकरण, गुणवत्ता, व्यक्तिमत्व विकास, शाळेची इमारत व छत परिसर राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देणारे उपक्रम, क्रीडास्पर्धा, आरोग्य, आर्थिक साक्षरता आदी उपक्रम शाळेत राबविण्यात येत आहेत. शाळांना या अभियानाचे प्रशिक्षण देण्यात आले. या अभियानात १०० टक्के शाळांनी ऑनलाईन सहभाग घेतला.

पालघर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रम अगदी सुंदर व गतिमान असून, हा उपक्रम शाळेच्या प्रगतीसाठी निश्चितच फायद्याचा होईल, पारितोषिक प्राप्त करण्यासाठी सहभाग घेण्याच्या स्पर्धेबरोबरच शैक्षणिक, भौतिक सुविधा मिळतील. त्यामुळे या अभियानाचा विद्यार्थ्यांना व शाळेला निश्चितच लाभ होईल.

- प्रकाश निकम, अध्यक्ष, पालघर जिल्हा परिषद

शाळेत भरघोस उपक्रम

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत शाळेत महावाचन अभियानपर बोलक्या भिंती, स्वच्छता माॅनिटर, स्काऊट गाईड, किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य समुपदेशन व आरोग्य मार्गदर्शन शिबीर व्यवहार ज्ञानाचे मार्गदर्शन ,बाल आनंद नगरी, गुणवंत विद्यार्थ्याचा गौरव या अभियानात शाळास्तरावर सर्व विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख शाळा व्यवस्थापन समिती पुढाकार घेत आहे. गटशिक्षणाधिकारी पुंडलिक चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी, नोडल अधिकारी, आदी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेसह शाळांना मार्गदर्शन करीत आहेत.

मूल्यांकन १०० गुणाचे

या अभियानाच्या माध्यमातून शाळांमधील स्पर्धा राहील, लाखो रुपयांचे पारितोषिक ४५ दिवसांमध्ये होणाऱ्या या उपक्रमांतर्गत मूल्यांकन होणार.

केंद्रस्तरावर मुख्याध्यापक, केंद्र प्रमुखांची समिती मूल्यमापन करून दोन शाळेची तालुकास्तरावर दोन शाळेची निवड केली जाणार आहे.

तालुकास्तरावर १०० गुणांचे मूल्यांकन होऊन गुणानुक्रमे येणाऱ्या शाळांना तीन, दोन व एक लाखाचे रोख पारितोषिक दिले जाणार.

logo
marathi.freepressjournal.in