मुख्यमंत्री शिंदे , उपमुख्यमंत्री फडणवीस श्री श्रीनिवास कल्याणम् महोत्सवात

मुख्यमंत्री शिंदे , उपमुख्यमंत्री फडणवीस श्री श्रीनिवास कल्याणम् महोत्सवात

सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन आमदार दादा भुसे उपस्थित होते.
Published on

डोंबिवली : तिरुपती बालाजी देवस्थान देशातील लाखो भक्तांच्या मनातील अढळ असे श्रद्धास्थान आहे; मात्र सर्व भाविकांना तिरुपती येथे जाऊन श्री बालाजी यांचे दर्शन घेणे अनेकदा शक्य नसते. या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभेचे संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने तसेच तिरुमला तिरुपती देवस्थान आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीत भव्य दिव्य स्वरूपात श्री श्रीनिवास कल्याणम् महोत्सवाचे आयोजन रविवार, २५ तारखेला डोंबिवली येथील प्रिमीयर कंपनी मैदान येथे संपन्न होणार झाला. यावेळी शहरात महोत्सवानिमित्त भव्य शोभायात्राही काढण्यात आली. सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन आमदार दादा भुसे उपस्थित होते.

हजारो डोंबिवलीकरांना तिरुपती बालाजीचे दर्शन प्रत्यक्षात या ठिकाणी करायची संधी मिळाली संपूर्ण परिसर मंगलमय वातावरण झाले होते.

logo
marathi.freepressjournal.in