चिपळे ‘जलजीवन मिशन’ योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी कटिबद्ध -आ. प्रशांत ठाकूर

देशातील प्रत्येक घरात पिण्याचे पाणी उपलब्ध झाले पाहिजे, या उद्देशाने देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून 'जलजीवन मिशन' योजना राबविली जात आहे.
चिपळे ‘जलजीवन मिशन’ योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी कटिबद्ध -आ. प्रशांत ठाकूर

पनवेल : देशातील प्रत्येक घरात पिण्याचे पाणी उपलब्ध झाले पाहिजे, या उद्देशाने देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून 'जलजीवन मिशन' योजना राबविली जात आहे. त्याच अनुषंगाने पनवेल तालुक्यातील चिपळे ग्रामपंचायत अंतर्गत ही योजना राबवली जात आहे; मात्र काही लोकांकडून या योजनेचा श्रेय लाटण्याचा आर्थिक फायदा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, या फसव्या वृत्तीला बळी पडू नये, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागरिकांना केले आहे. तसेच या योजनेच्या कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जलजीवन मिशन योजना संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांसोबत आज खांदा कॉलनीत बैठक पार पडली. या बैठकीस एमजेपीचे अभियंता जगताप, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, राजेंद्र पाटील, सरचिटणीस भूपेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, सुनील पाटील, माजी सरपंच रमेश पाटील, ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in